Cricket World Cup 2023: ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून ती १९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. भारतात एकूण १० ठिकाणी एकूण ४८ सामने खेळवले जातील. या १० ठिकाणांमध्ये पंजाबला यावेळी एकाही सामन्याचे यजमानपद मिळालेले नाही. अशा परिस्थितीत पंजाबचे क्रीडा मंत्री गुरमीत सिंग मीत हेअर यांनी मोहालीला आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३चे यजमान शहरांच्या यादीतून बाहेर ठेवल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
क्रिकेट विश्वचषक २०२३च्या कार्यक्रमात यजमान शहरांच्या यादीतून मोहालीला वगळल्याबद्दल क्रीडा मंत्री गुरमीत सिंग मीत हेअर यांनी नाराजी व्यक्त करत याचा निषेध म्हणून आपल्या पदाचा राजीनामा ते देणार आहेत. सरकार आणि बीसीसीआयचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे क्रीडामंत्र्यांनी म्हटले आहे. या स्पर्धेच्या यजमान शहरांच्या यादीतून मोहालीला वगळणे हा पंजाब क्रिकेट असोसिएशनवर अन्याय असल्याचे क्रीडामंत्र्यांनी सांगितले. पंजाब सरकार हा मुद्दा बीसीसीआयकडे मांडणार असल्याचे ते पुढे म्हणाले.
वर्ल्डकपमधील साखळी सामना आयोजित केला नाही
गुरमीत हेयर म्हणाले की, “विश्वचषक सामन्यांच्या यजमानपदातून पंजाबला वगळणे हा भेदभाव आहे. कारण पीसीए स्टेडियम मोहालीच्या बांधकामानंतर पहिल्यांदाच विश्वचषक भारतात होत आहे आणि मोहालीमध्ये कोणतेही सामने होत नाहीत. १९६६ आणि २०११मध्ये मोहाली येथे विश्वचषक उपांत्य फेरीचे सामने खेळले गेले होते, परंतु यावेळी एकाही लीग सामन्याचे आयोजन केले नाही.
राजकारणाने प्रेरित यजमान यादीतून मोहालीला वगळले
उद्घाटन आणि अंतिम सामन्यांव्यतिरिक्त, अहमदाबादने भारत-पाकिस्तान सामन्याचे आयोजन केले आहे.” गुरमीत पुढे म्हणाले की, “पीसीए स्टेडियम मोहाली हे भारतातील केवळ पाच स्टेडियमपैकी एक नाही तर जगातील निवडक स्टेडियमच्या यादीतही येते. क्रिकेटप्रेमींची पहिली पसंती असलेल्या मोहालीला यजमानांच्या यादीतून वगळणे यात मला एक राजकीय डाव दिसत आहे.”
शहरात संघांच्या मुक्कामासाठी उत्तम पायाभूत सुविधा
पंजाबवर झालेला हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार अशा भेदभावाचा मुद्दा बीसीसीआयकडे उचलून धरणार आहे.” क्रीडामंत्र्यांनी सांगितले की, “मोहालीला एकीकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, दुसरीकडे शहरात चांगल्या पायाभूत सुविधा आणि संघांना राहण्यासाठी पुरेशी हॉटेल्स आहेत.
पंजाबमध्ये देश-विदेशातील पर्यटक येतात
मोहालीतील सामन्यांचे आयोजन क्रीडा पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि देश-विदेशातील खेळाशी संबंधित खेळाडूंना पंजाबमध्ये येण्यास मदत होईल, ज्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल.