दीपक जोशी
न्यूझीलंडचा संघ दक्षिण आफ्रिकेशी १९९२पासून ७० सामन्यांत खेळला आहे. यापैकी २४ विजय न्यूझीलंडने आणि ४१ विजय आफ्रिकेने मिळवले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ रौप्यमहोत्सवी विजयाच्या उंबरठय़ावर आहे. उभय संघ विश्वचषकात दोनदा आमनेसामने आले आहेत. २०११च्या विश्वचषकामधील उपांत्यपूर्व सामन्यात न्यूझीलंडने आफ्रिकेला ४९ धावांनी नमवले, तर २०१५च्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने आफ्रिकेला चार गडी राखून पराभूत केले. म्हणजेच विश्वचषकात न्यूझीलंडचे वर्चस्व राहिले आहे. आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहीरने (३७) दोन बळी मिळवल्यास तो विश्वचषकामधील अॅलन डोनाल्डला (३८) विक्रम मागे टाकू शकेल.