सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडीत यांच्यासारख्या अनेक खेळाडूंची कारकिर्द घडवण्यात मोठा वाटा असलेल्या प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं निधन झालं. वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धापकाळानं त्यांची प्राणज्योत मालवली. आचरेकर सरांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर क्रिकेट जगतातील आजी-माजी खेळाडू आणि विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Story img Loader