Virat Kohli 300th ODI Match: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच क्रिकेट इतिहासात आपले नाव कोरले आहे. कारण एकदिवसीय क्रिकेटमधील हा त्याचा ३०० वा सामना ठरला आहे. याचबरोबर विराट कोहली ३०० एकदिवसीय सामन्यांचा टप्पा ओलांडणारा ७वा भारतीय आणि एकूण १८वा क्रिकेटपटू ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३०० व्या एकदिवसीय सामन्यांबरोबरच, कोहली किमान १०० कसोटी आणि १०० टी२० सामने खेळणारा जगातिल पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आतापर्यंत एकूण १८ क्रिकेटपटूंनी आपापल्या देशांसाठी ३०० एकदिवसीय सामने खेळले आहेत परंतु त्यापैकी कोणीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इतर दोन्ही स्वरूपात १०० सामने खेळलेले नाहीत.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी २९९ एकदिवसीय सामन्यांमध्ये विराटने ५८.२० च्या सरासरीने आणि ९३.४१ च्या स्ट्राईक रेटने १४,०८५ धावा केल्या होत्या. विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४,००० धावा पूर्ण करताना अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८,००० धावा (१७५ डाव), ९,००० धावा (१९४ डाव), १०,००० धावा (२०५ डाव), ११,००० धावा (२२२ डाव), १२,००० धावा (२४२ डाव), १३,००० धावा (२८७ डाव) आणि १४,००० धावा (२९९ डाव) वेगाने पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.

भारताकडून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारे क्रिकेटपटू

न्यूझीलंडविरुद्धचा हा सामना कोहलीच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ३०० वा सामना असेल. आज मैदानावर उतरताच, कोहली भारतासाठी ३०० किंवा त्याहून अधिक एकदिवसीय सामने खेळणारा सातवा खेळाडू बनेल. सचिन तेंडुलकरने भारतासाठी सर्वाधिक ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यानंतर, धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ३५० एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्यानंतर राहुल द्रविड (३४४), अझहर (३३४), सौरव गांगुली (३११) आणि युवराज सिंग (३०४) यांचा क्रमांक लागतो.

आणखी एका विक्रमाची संधी

एकदिवसीय सामन्यांमध्ये, कोहलीने आतापर्यंत एकूण २९९ सामन्यांमध्ये १४,०८५ धावा केल्या आहेत. आता जर कोहलीने आजच्या सामन्यात १५० धावा केल्या तर तो एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनेल. एकदिवसीय सामन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर आहे. कुमार संगकाराने ४०४ सामन्यांमध्ये १४,२३४ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तेंडुलकरने १८,४२६ धावा केल्या आहेत.