Virat Kohli 300th ODI: सध्या पाकिस्तान आणि युएईमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गट फेरीतील शेवटचा सामना होणार आहे. दरम्यान हा सामना विराट कोहलीसाठी खास असणार आहे. विराट कोहली आज त्याचा ३०० वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक ठोकून त्याने त्याच्या फॉर्म आणि भविष्याबद्दलच्या शंका दूर केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंडविरुद्धचा हा सामना कोहलीच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ३०० वा सामना असेल. आज मैदानावर उतरताच, कोहली भारतासाठी ३०० किंवा त्याहून अधिक एकदिवसीय सामने खेळणारा सातवा खेळाडू बनेल. सचिन तेंडुलकरने भारतासाठी सर्वाधिक ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यानंतर, धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ३५० एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्यानंतर राहुल द्रविड (३४४), अझहर (३३४), सौरव गांगुली (३११) आणि युवराज सिंग (३०४) यांचा क्रमांक लागतो.

२९९ सामन्यांनंतर कुठे होता सचिन?

दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून विराट कोहलीने दमदार कामगिरी करत अनेक विक्रम केले आहेत. इतकेच नव्हे तर दिग्गज सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रमही विराटने मोडले आहेत. अशात २९९ सामन्यांनंतर सचिन आणि विराट यांची एकदिवसीय क्रिकेटमध्ये कशी कामगिरी राहिली आहे, ते पाहूया.

२९९ एकदिवसीय सामन्यांनंतर सचिनने २९० डावांत ११,५३७ धावा केल्या होत्या. या धावा त्याने ४४.२० च्या सरासरीने केल्या होत्या. यामध्ये ३३ शतके आणि ५६ अर्धशतकांचा समावेश होता. दुसरीकडे २९९ एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट कोहलीला २८७ डावांत फलंदाजीची संधी मिळाली होती. यामध्ये त्याने ५८.२० सरासरीने १४,०८५ धावा केल्या होत्या. यात ५१ शतके आणि ७३ अर्थशतकांचा समावेश आहे.

२९९ एकदिवसीय सामनेविराट कोहलीसचिन तेंडुलकर
डाव२८७ २९०
धावा१४,०८५११,५३७
शतक५१३३
अर्धशतक७३५६

संगाकाराला मागे टाकण्याची संधी

एकदिवसीय सामन्यांमध्ये, कोहलीने आतापर्यंत एकूण २९९ सामन्यांमध्ये १४,०८५ धावा केल्या आहेत. आता जर कोहलीने आजच्या सामन्यात १५० धावा केल्या तर तो एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनेल. एकदिवसीय सामन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कुमार संगकाराच्या नावावर आहे. कुमार संगकाराने ४०४ सामन्यांमध्ये १४,२३४ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तेंडुलकरने १८,४२६ धावा केल्या आहेत.