भारतीय संघातील आघाडीचा फिरकीपटू युझवेंद्र चहल सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून तो चाहत्यांना काहीनाकाही अपडेट्स देत असतो. आताही त्याने आपल्या आवडत्या मैदानावर आपली आवडती पोझ रिक्रिएट केली आहे. चहलने आपला हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०१९ विश्वचषकामध्ये युझवेंद्र चहलचा मैदानाच्याकडेला झोपलेल्या अवस्थेतील फोटो फार व्हायरल झाला होता. त्याची ही प्रसिद्ध पोझमुळे अनेक मीम्सही तयार झाले आहे. आता त्याने आपली ही आवडती पोझ रिक्रिएट केली आहे. युझवेंद्र चहलने शनिवारी (१३ ऑगस्ट) बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पुन्हा झोपलेल्या अवस्थेत फोटो काढला आहे. ‘आवडत्या मैदानावर, आवडती पोझ’, या कॅप्शनसह त्याने ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे.

इंडियन प्रिमियर लीगमध्ये (आयपीएल) राजस्थान रॉयल्सच्या संघात जाण्यापूर्वी युझवेंद्र चहल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात होता. एम चिन्नास्वामी स्टेडियम हे बंगळुरूचे घरचे मैदानम्हणून ओळखले जाते. चहलला सुद्धा हे या क्रिकेट मैदानाला आपले आवडते मैदान मानतो.

हेही वाचा – ‘जेव्हा दोन धवन समोरासमोर येतात’; वरुण धवनने शेअर केले शिखर धवनबरोबरचे फोटो

युझवेंद्र चहलने आयपीएलमध्ये बंगळुरूच्या संघाकडून ११३ सामने खेळले असून त्यात १३९ गडी बाद केले आहेत. आयपीएलच्या १५व्या हंगामामध्ये चहल राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला. त्यात १७ सामने खेळून त्याने सर्वाधिक २७ गडी बाद केले. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी चहलची भारतीय संघात निवड झाली आहे. भारताचा पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.