करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. परंतु त्याआधी लाहोर कलंदर्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार विदेशी फलंदाज बेन डंक सरावाच्या वेळी गंभीर जखमी झाला. त्याच्या ओठांवर शस्त्रक्रिया झाली आहे. झेल घेण्याच्या प्रयत्नात असताना चेंडू त्याच्या तोंडावर पडला.

या अपघातानंतर डंकच्या तोंडाला ७ टाके पडले आहेत. फ्रेंचायझीचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीन राणा म्हणाले, ”डंक व्यवस्थित आहे. तो संघासाठी पहिला सामना खेळेल अशी अपेक्षा आहे.” यष्टीरक्षक-फलंदाज डंकने ६ जून रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यानंतर त्याच्या दुखापतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

हेही वाचा – लंकेला नेस्तनाबूत करण्यासाठी टीम इंडिया सज्ज..! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक आले समोर

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ben Dunk (@bendunk)

”माझे ओठांना बरे करण्यासाठी आणि माझे मॉडेलिंगचे स्वप्न जिवंत ठेवल्याबद्दल बुर्जील हॉस्पिटलच्या सर्जन आणि नर्सचे आभार”, असे डंकने सांगितले. उद्या ९ जून रोजी अबुधाबी येथे लाहोर कलंदर्स इस्लामाबाद युनायटेडविरुद्ध सामना खेळणार आहे. लाहोरचा संघ चार पैकी तीन सामने जिंकल्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – टी-१० क्रिकेटमध्ये फलंदाजाचं २८ चेंडूत शतक, प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना पळव पळव पळवलं!

पाकिस्तान सुपर लीग सुरुवात तीन महिन्यांपूर्वी लाहोर येथे सुरु झाली होती. परंतु, कोरोना संक्रमनामुळे अर्ध्यात ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. बेन डंक या स्पर्धेतील स्टार खेळाडू आहे. डंकने २०१४ साली ऑस्ट्रेलिया संघात पदार्पण केले होते. त्यानंतर तो २०१७ला ऑस्ट्रेलिया संघासाठी खेळला. ऑस्ट्रेलियासाठी त्याने फक्त ५ टी-२० सामने खेळले आहेत.

Story img Loader