भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने बुधवारी आपली प्रेयसी जया भारद्वाजसोबत लग्नगाठ बांधली. आग्रा येथील ‘जेपी पॅलेस’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. दीपक आणि जयाच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. बुधवारी पार पडलेल्या या लग्न सोहळ्यासाठी दीपक आणि जयाचे कुटुंबिय व जवळचे नातेवाईक उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीची रहिवासी असलेली जया भारद्वाज एका कॉर्पोरेट कंपनीशी संबंधित आहेत. जयाने मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आहे. इन्स्टाग्रामवर जया स्वत:ला ‘डायनॅमिक उद्योजक’ आणि ‘नॉन-टेक्निकल टेकी’ असे म्हटलेले आहे. जयाचा भाऊ सिद्धार्थ भारद्वाज हा ‘बिग बॉस’मध्ये स्पर्धक होता. याशिवाय तो एमटीव्ही स्प्लिट्सविला या कार्यक्रमाच्या दुसऱ्या हंगामाचा विजेतादेखील आहे.

दीपक चहरच्या लग्नामध्ये त्याचा चुलत भाऊ आणि डावखुरा गोलंदाज राहुल चाहर व बहीण मालती चहरने बहारदार नृत्य केले. राहुल चहर आणि मालतीचेही फोटोही प्रचंड व्हायरल होत आहे. माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांसाठी हातरस येथील प्रसिद्ध रबडी, आग्रा येथील चाट, अवधी, मुघलाई, दक्षिण भारतीय, इटालियन आणि थाई खाद्यपदार्थांचा समावेश असलेल्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

यापूर्वी, मंगळवारी संध्याकाळी जया आणि दीपकचा संगीत सोहळा झाला होता. त्या कार्यक्रमाचेही काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. दीपक चहरचा चुलत भाऊ राहुल चहरने इन्स्टाग्राम स्टोरीवर भावाला आणि वहिनीला शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीतील आयटीसी मौर्य हॉटेलमधील कमल महलमध्ये दोघांचा स्वागत सोहळा आयोजित केला जाणार आहे. त्यामध्ये अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू सहभागी होण्याची शक्यता आहे. पाहुण्यांच्या यादीत विराट कोहलीचेही नाव असल्याची चर्चा आहे.

वेगवान गोलंदाज असलेला दीपक चेन्नई सुपर किंग्ज संघातून आयपीएल खेळतो. आयपीएलमुळे तो सर्वात अगोदर प्रसिद्ध झाला होता. आयपीएलच्या मागील हंगामात चेन्नईच्या सामन्यानंतर दीपकने मैदानाच्या बाजूलाच जया भारद्वाजला लग्नाची मागणी घातली होती.