Deepak Hooda has married his girlfriend : भारतीय संघाचा स्टार फलंदाज दीपक हुड्डा विवाहबद्ध झाला. शुक्रवारी एका खासगी समारंभात हिमाचलमधील प्रेयसीसोबत सात फेरे घेतले. या सोहळ्याला काही मित्र परिवारातील सदस्यांनी हजेरी लावली होती. दीपक हुड्डाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याची पुष्टी केली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्याने आपल्या पत्नीसाठी एक सुंदर संदेशही लिहिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीपक हुड्डाने इंस्टाग्रामवर शेअर केली पोस्ट –

दीपक हुड्डा यांनी एक सुंदर संदेश लिहिला आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत दीपक हुड्डा यांनी लिहिले, ‘९ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर, प्रत्येक क्षण, प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक संभाषण आम्हाला या सुंदर दिवसाकडे घेऊन आले. जर आपण एकमेकांना थोडा वेळ साथ दिली आणि एकमेकांवर विश्वास कायम ठेवला, तर अशा आठवणी विणल्या जातात. माझ्या छोट्याशा हिमाचली नववधू, आमच्या घरी स्वागत आहे, कुटुंब आणि मित्रांनी वेढलेल्या आणि त्यांच्या आशीर्वादाने वर्षाव करून, आम्ही कायमचे एकत्र आयुष्य सुरू केले. आमचे मन भरले आहे, सर्वांचे आभार.”

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द –

दीपक हुड्डाने भारतीय संघासाठी १० एकदिवसीय आणि २१ टी-२० सामने खेळले आहेत. या कालावधीत दीपकने एकदिवसीय सामन्यात १५३ धावा आणि टी-२० मध्ये ३६८ धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे. अर्धवेळ ऑफ स्पिनर दीपक हुड्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ९ विकेट्स घेतल्या आहेत. हुड्डाने शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

हेही वाचा – Paris Olympics 2024 : सिगारेट ओढणे ‘या’ स्टार खेळाडूला पडले चांगलेच महागात, ऑलिम्पिकमधून पाठवण्यात आले मायदेशी

आयपीएल २०२४ मध्ये दीपकची कामगिरी खराब राहिली –

दीपक हुड्डा यांनी शेवटचा आयपीएल २०२४ मध्ये भाग घेतला होता. लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दीपक हुडाची कामगिरी खराब होती. दीपकने ११ सामन्यात १३८.१० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना १४५ धावा केल्या होत्या. या काळात त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. यामुळे, आयपीएल २०२५ पूर्वी होणाऱ्या मेगा लिलावात लखनऊ सुपर जायंट्स संघ दीपक हुडाला कायम ठेवणार नाही, अशी शक्यता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricketer deepak hooda has married his girlfriend after dating for nine years and shares wedding photos on instagram vbm