Cricketer Dies of Heart Attack: क्रिकेट खेळताना किंवा व्यायाम करत असताना तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अनेकदा अशाप्रकारच्या घटना समोर आलेल्या आहेत. आताही जालना जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जालना शहरात आयोजित क्रिकेट स्पर्धेत एका फलंदाजाचा खेळत असताना क्रिझवरच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. ३२ वर्षीय खेळाडू जागीच कोसळल्याचे सदर व्हिडीओमध्ये दिसत असून तरुणांच्या आरोग्याबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हाती आलेल्या माहितीनुसार, जालना शहरातील फ्रेजर बॉईजच्या मैदानावर ख्रिसमस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय पटेल बॅटिंग करत होता. त्याने सिक्सर मारल्यानंतर मधल्या वेळात तो सहकारी फलदांज अजय कसबेशी बातचीत करत होता. तेवढ्यात तो जमिनीवर कोसळला. यावेळी त्याला पाहण्यासाठी इतर खेळाडूंनी धाव घेतल्याचे दिसून येते.
हे वाचा >> हिवाळ्यात Heart Attack चा धोका का वाढतो? जाणून घ्या खरं कारण
सहकारी फलंदाजाने काय सांगितले?
विजय पटेलचा सहकारी खेळाडू अजय कसबेने एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, आम्ही दोघे बॅटिंग करत होतो. पटेलने सिक्सर मारल्यानंतर मी क्रिझवर चालत जाऊन त्याचे अभिनंदन केले. त्यानंतर तो पुन्हा एकदा बॅटिंगसाठी वळला आणि मी नॉन स्ट्राईक एंडकडे गेलो. पण तेवढ्यात मला पंचाने सांगितले की, तुझा सहकारी मैदानावर पडला आहे. मीही वळून त्याच्याकडे धावत गेलो. आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हे वाचा >> हृदयविकाराचा झटका ओळखून स्मार्ट वॉच तुमचा जीव वाचवू शकतो का? वाचा संशोधनातून समोर आलेली माहिती…
पूर्वी हृदयविकाराचा झटका साधारणतः वयाची साठी उलटल्यानंतर यायचा; मात्र आता अगदी तरुण वयातही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. हृदयविकाराचे (Cardiovascular diseases) प्रमाण भारतात १९९० मध्ये २५.७ दशलक्ष होते, जे २०२३ मध्ये ६४ दशलक्षांपर्यंत जाऊन पोहोचले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, जगभरातील हृदयविकाराच्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक-पंचमांश मृत्यू भारतात होतात, विशेषत: तरुणांचे. अमेरिकेतही हृदयविकाराचा झटका आलेल्या पाचपैकी एक रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचा असल्याची नोंद आहे. हृदयविकारासाठी वाढता तणाव आणि बदलत्या जीवनशैली या बाबींना जरी कारणीभूत ठरवले गेले असले तरी अनेकांना अपचनासारख्या इतरही काही समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येत असल्याचे सांगितले जाते.
हे ही वाचा >> तरुण वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण का वाढतेय? याचा अपचनाशी काही संबंध आहे का?
कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याची संभाव्य कारणे काय?
हृदयविकाराचा झटका येण्यामागे अनेक कारणे आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात की, अनेक तरुण-तरुणी किंवा निरोगी लोक त्यांचे कोलेस्ट्रॉल किंवा रक्तदाब नियमितपणे तपासत नाहीत आणि त्यामुळे असे धोके वाढतात. बैठी जीवनशैली, वाढता लठ्ठपणा आणि आयुष्यातील वाढता ताण ही तरुणांना हृदयविकाराचा झटका येण्याची अतिरिक्त कारणे असू शकतात. फास्ट फूड, जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरयुक्त पेयेदेखील या समस्येला कारणीभूत ठरतात.