Jaspreet Bumrah जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराहला नुकत्याच पार पडलेल्या T20 World Cup मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. जसप्रीत बुमराह हा त्याच्या यॉर्करसाठी ओळखला जातो. अल्पावधीत त्याने भारतीय क्रिकेट संघात गोलंदाजीची धुरा सांभाळली त्याचं कारण त्याची खास अशी शैली आहे. जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन उत्तम क्रिकेट समालोचक आहे. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर या दोघांचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. कमी धावा देऊन प्रतिस्पर्धी संघातील धुरंदर फलंदाजांची कोंडी कशी हे बुमराहला चांगलं ठाऊक आहे. याच जसप्रीत बुमराहची उपस्थिती एक्स्प्रेस अड्डामध्ये आहे. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका हे बुमराहशी संवाद साधत आहेत. हा कार्यक्रम तुम्ही लाईव्ह पाहू शकता या लिंकवर क्लिक करुन-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा