भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार असून आयपीएल क्रिकेटमध्येदेखील तो धडाकेबाज खेळी करतोय. नुकताच त्याचा वाढदिवस झाला. दरम्यान सध्या केएल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार असून तो आपली प्रेमिका अथिया शेट्टीसोबत विवाह करणार असल्याचे म्हटले जातेय. अथिया शेट्टी अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी आहे.

हेही वाचा >> IPL 2022, RCB s LSG : विराटला नेमकं काय झालंय ? पहिल्याच चेंडूवर शून्यावर झेलबाद

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यापूर्वी अनेकवेळा एकत्र दिसलेले आहे. राहुलच्या वाढदिवशी अथियाने तिच्या सोशल मीडियावर दोघांचे खास फोटो शेअर करत एक प्रकारे दोघांमधील प्रेमाची कबुलीच दिली होती. तिच्या या फोटोंवर राहुलने लव्ह यू म्हणत तिच्यावरील प्रेम व्यक्त केले होते. लखनऊ सुपर जायंट्सचा सामना सुरु असताना केएल राहुलची फलंदाजी पाहण्यासाठी अथियाने अनेक वेळा हजेरी लावलेली आहे. आता हे देघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. या दोघांच्या विवाहाची तयारीही सुरु झाली आहे. ही जोडी हिवाळ्यापर्यंत साऊथ इंडियन पद्धतीने विवाह करण्याची शक्यता आहे. पिंकविलाने याबाबत अधिक वृत्त दिले आहे.

हेही वाचा >> Shreyas Iyer : केकेआरच्या श्रेयस अय्यरवर तरुणी फिदा, हातात पोस्टर घेत विचारले लग्न करशील का ?

पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार अथिय शेट्टी आणि के एल राहुल यावर्षी म्हणजेच २०२२ च्या शेवटपर्यंत विवाह करण्याची शक्यता आहे. असे असले तरी अथिया शेट्टीचे वडील अभिनेता सुनिल शेट्टी यांनी याबाबत मौन बाळगले आहे.

Story img Loader