Mohammad Shami ordered to get bail in 30 days: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. पत्नी हसीन जहाँपासून शमीचा खटला सुरू आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्याला ३० दिवसांत जामीन घेण्याचे आदेश दिले आहेत. हसीन जहाँने शमी आणि त्याचा भाऊ मोहम्मद हसीबवर आरोप केले होते. आज तकच्या वृत्तानुसार आता न्यायालयाच्या आदेशानंतर दोन्ही भावांना ३० दिवसांत जामीन मिळवावा लागणार आहे.
३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकात टीम इंडियात त्याचा समावेश झाल्याने मोहम्मद शमीसाठीही तणाव वाढला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आणि त्यानंतर होणाऱ्या विश्वचषकात तो टीम इंडियासाठी महत्त्वाचा अस्त्र असेल. अशा परिस्थितीत आता शमीला ३० दिवसांच्या आत कोर्टातून जामीन मिळवावा लागणार आहे.
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँची २०११ मध्ये झाली होती भेट –
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचा प्रेमविवाह झाला होता. हसीन जहाँ आयपीएलमध्ये मॉडेल आणि चीअरलीडर राहिली आहे. शमी आणि हसीन जहाँ यांची २०११ मध्ये भेट झाली होती. त्यानंतर हसीन जहाँ कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाची चीअरलीडर होती. येथून शमी आणि हसीन जहाँ यांच्यातील प्रेमकहाणी सुरू झाली आणि २०१४ मध्ये दोघांनी लग्न केले. त्यानंतर हसीन जहाँने मॉडेलिंग आणि व्यावसायिक जीवन सोडले. २०१८ मध्ये, दोघांमध्ये काही गोष्टीवरून कटुता निर्माण झाली आणि अचानक हसीन जहाँने मारहाण, घरगुती हिंसाचार, छळ आणि मॅच फिक्सिंगसह अनेक गंभीर आरोप केले. यानंतर दोघेही वेगळे राहू लागले आणि कोर्टात केस सुरू झाली.
हेही वाचा – Chandrayaan-3 च्या यशाबद्दल आर अश्विनच्या ट्विटला पीएम मोदींचा आला रिप्लाय! बिंग फुटल्यानंतर झाला ट्रोल
हसीन जहाँने १० लाख रुपयांची केली आहे मागणी –
हसीन जहाँ पुन्हा २०१८ मध्ये, तिच्या व्यवसायात परतली. हसीन जहाँने १० लाखांच्या पोटगीसाठी कोर्टात केस दाखल केली होती. यामध्ये ७ लाख रुपये तिची वैयक्तिक पोटगी आणि ३ लाख रुपये त्यांच्या मुलीच्या देखभालीसाठी खर्च होता. हसीनचे वकील मृगांका मिस्त्री यांनी न्यायालयात दावा केला होता की, २०२२ पर्यंत शमीचे वार्षिक उत्पन्न ७ कोटी रुपये होते.
हेही वाचा – Virat Kohli: आशिया कपपूर्वी यो-यो टेस्ट पास झाल्यानंतर किंग कोहली दिसला आनंदी, जाणून घ्या किती केला स्कोअर
अशा परिस्थितीत दरमहा १० लाख रुपयांची पोटगी अजिबात जास्त नाही. यावर शमीचे वकील सेलीम रहमान यांनी दावा केला की, हसीन जहाँ स्वतः ५० लाख रुपये कमवत आहे. ती स्वतः एक प्रोफेशनल फॅशन मॉडेल आहे. अशा परिस्थितीत तिची पोटगी तेवढी होत नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने दरमहा १.३० लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय दिला होता.