Padmakar Shivalkar Passed Away : देशातील सर्वोत्तम डावखुऱ्या फिरकीपटूंपैकी एक पद्माकर शिवलकर यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते आणि गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. शिवलकर यांनी देशाच्या राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. निवृत्ती घेतल्यानंतर शिवलकर यांनी मुंबई रणजी ट्रॉफी संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील काम केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९६० आणि ७०च्या दशकात जेव्हा मुंबईचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये दबदबा होता तेव्हा शिवलकर यांचे नाव मोठे होते. २०१७ मध्ये शिवलकर यांना बीसीसीआय सीके नायूडू जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्याच काळातील डावखुरे फिरकीपटू राजेंद्र गोयल यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला होता. गोयल यांना देखील भारतीय क्रिकेट संघात खेळण्याची संधी मिळाली नाही.

खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर शिवलकर यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले. येथे त्यांनी अनेक प्रतिभावान खेळाडूंना घडवले. जसे की हरमीत सिंग जो अंडर १९ आणि मुंबईसाठी खेळला आणि पुढे यूएसए संघात सहभागी झाला.

एकनाथ शिंदे यांची पोस्ट

एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट ककेली आहे. “मुंबई क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक आहे. आपल्या डावखुऱ्या ऑर्थोडॉक्स गोलंदाजीने त्यांनी अनेक दिग्गज फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वातील एक तारा निखळला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना या दुःखातून सावरण्याकरता बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली…”, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवलकर यांना आदरांजली वाहिली आहे.