Cricketer Rishabh Pant Accident Updates: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून घरी येत असताना पंतच्या स्पोर्ट्स कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पंतवर देहरादूनमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून त्याला पुढील उपचारांसाठी दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. मात्र पंतचा अपघात झाल्याची माहिती समोर येताच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना त्याच्या उपचारासंदर्भात विशेष निर्देश दिले आहेत. या अपघाताबद्दलच्या १० महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात…
> मंगळूरु आणि निरसन मार्गावर पंतच्या गाडीला अपघात झाला.
> हरिद्वार जिल्ह्यामध्ये हा अपघात झाल्यानंतर पंतला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्याच्यावर रुरकी प्रशासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
> राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५८ वर हा अपघात झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक स्वपन किशोर यांनी दिली.
> हम्मदपुर झाल येथील एका वळणावर भरधाव वेगात असलेल्या ऋषभ पंतच्या कारचा अपघात झाला.
नक्की पाहा >> Rishabh Pant Car Accident Photos: काळ आला होता पण…; क्षणात खाक झाली पंतची स्पोर्ट्स कार; रुग्णालयातील फोटोही आले समोर
> या भीषण अपघातीच माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि खानपुरचे आमदार उमेश कुमार हेदेखील रुग्णालयात पोहचले.
> डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पंतची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
> उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतच्या अपघातानंतर अधिकाऱ्यांना त्याच्या उपचारासाठी सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश दिलेत.
हेही वाचा >> ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाल्यानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट, म्हणाली…
> गरज पडल्यास त्याच्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सचीही सेवा पुरवा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
> प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभची कार रेलिंगला धडकल्याने अपघात झाला.
> रेलिंगला धडकल्यानंतर गाडीने पेट घेतला असंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.