गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपटू ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला चर्चेत आहेत. सोशल मीडियावर दोघांमध्ये जोरदार ‘वाक् युद्ध’ सुरू आहे. अशातच उर्वशीने ऋषभला “छोटू भैया बैट-बॉल खेलो,” असा सल्ला दिला होता. तिची ही कृती ऋषभ पंतच्या चाहत्यांना अजिबात रुचली नाही. त्यांनी उर्वशीला चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर तिने ऋषभ पंतबद्दल केलेली पोस्ट डिलीट केली. त्यामुळे तर ऋषभच्या चाहत्यांना आणखी स्फुरण चढले आहे. त्यांनी उर्वशीला ट्रोल केले आहे.

हेही वाचा – “मेरा पिछा छोडो बहन”; सोशल मीडियावर रंगला ऋषभ पंत अन् उर्वशी रौतेलाचा वाद

अलीकडेच उर्वशी रौतेलाने एका मुलाखतीत ऋषभ पंतचे थेट नाव न घेता त्याच्याबद्दल काही वक्तव्ये केली होती. ऋषभ पंतने हॉटेलमध्ये सुमारे दहा तास तिची वाट बघितली होती, असा खुलासा तिने केला होता. तिच्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. या प्रकारामुळे ऋषभ पंतचे चाहते संतापले होते.

उर्वशीने वादग्रस्त वक्तव्ये केल्यानंतर ऋषभ पंतही शांत बसला नाही. त्याने सोशल मीडियावर तिला ‘बहीण’ म्हणत उत्तर दिले. “प्रसिद्धीसाठी लोकं किती खोट बोलतात,” असेही ऋषभ म्हणला होता. त्याच्या प्रत्युत्तरानंतर उर्वशीने पुन्हा ऋषभवर निशाणा साधला. ती म्हणाली, “मी मुन्नीसारखी बदनाम नाही. छोटू भैया, तू बॅट-बॉल खेळायला पाहिजे.” उर्वशीच्या उत्तरानंतर हे प्रकरण अधिकच चिघळले. नंतर, मात्र, दोघांनी आपापल्या पोस्ट हटवून या प्रकरणाला पूर्णविराम दिला.

दोघांनी आपापल्या पोस्ट हटवून या प्रकरणाला पूर्णविराम दिला असला तरी, चाहते अजूनही संतापलेलेच आहेत. उर्वशीने पोस्ट डिलीट केल्यानंतर ऋषभ पंतच्या चाहत्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. चाहत्यांनी मजेशीर मीम्स शेअर केले आहेत.

Story img Loader