दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून (IND vs SA) बाहेर पडलेला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांनी दुखापतीतून सावरण्यासाठी तयारी सुरू केली आहे. हे दोन्ही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचले. या दोघांनी आपल्या रिहॅब प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
२५-सदस्यीय भारतीय अंडर-१९ संघ २३ डिसेंबरपासून यूएईमध्ये खेळल्या जाणार्या आगामी आशिया चषकापूर्वी एनसीए येथे सराव करत आहे. दिल्लीचा यश धुल देखील या शिबिराचा एक भाग आहे. अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत यश धुल भारतीय संघाचे नेतृत्व करेल. यशने एनसीएमध्ये रोहित आणि जडेजासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
रोहित आणि जडेजा यांच्या अभावामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारताला उणीव भासणार आहे. कारण दोन्ही खेळाडूंनी अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर जडेजाच्या उपस्थितीमुळे संघाचा समतोलही चांगला राखला होता.
हेही वाचा – VIDEO : हसून हसून दुखेल पोट..! विराटनं घातला इशांतच्या बॅगेत हात अन् मिळालं…!
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची घोषणा करताना रोहित शर्माला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले. मात्र, सराव करताना रोहितला दुखापत झाली आणि कसोटी मालिकेतून तो बाहेर पडला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा प्रियांक पांचाळला रोहितऐवजी संघात स्थान देण्यात आले आहे.
दुसरीकडे, कानपूरमधील पहिल्या कसोटीदरम्यान जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली. स्कॅन केल्यानंतर त्याच्या खांद्याला सूज असल्याचे आढळून आले. जडेजाला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटीतूनही त्याला वगळण्यात आले.