Shardul Thakur and Mithali Parulkar Marriage: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूरने त्याची गर्लफ्रेंड मिताली पारुलकरसोबत लग्न केले आहे. या दोघांनी सोमवारी (२७ फेब्रुवारी) मुंबईत मराठी रितीरिवाजावनुसार विवाह बंधनात अडकले. केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्यानंतर या वर्षी लग्न करणारा शार्दुल ठाकूर हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. शार्दुल ठाकूर आणि मिताली परुलकर यांच्या लग्नाचे फोटोही समोर आले आहेत.

शार्दुल-मितालीचे लग्न मोठ्या थाटामाटात –

शार्दुल-मितालीचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नापूर्वी संगीत समारंभ आणि हळदी समारंभही आयोजित करण्यात आले होते. यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यरही सहभागी झाले होते. एवढेच नाही तर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, अभिषेक नायर आणि मुंबई संघाचा स्थानिक सिद्धेश लाड देखील दिसून आले.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
PM Modi
PM मोदींचा ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ आता ‘वेड इन इंडिया’वर भर; देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलही केलं मोठं वक्तव्य
Image of police
Sambhal Violence : संभलमधील पोलिसांच्या कारवाईचे पत्नीने केले कौतुक, संतापलेल्या पतीने दिला ‘तिहेरी तलाक’ 

संगीत समारंभाच्या आधी एक पूल पार्टीचे आयोजन –

रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेहने संगीत सोहळ्यात सहभागी झाले होते. तर श्रेयस अय्यर आणि युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हळदी समारंभात सहभागी झाली होती. शार्दुल ठाकूर आणि मिताली परुलकर यांनी संगीत समारंभाच्या आधी एक पूल पार्टीही आयोजित केली होती, ज्यामध्ये दोघांनी त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत खूप मजा केली.

नोव्हेंबर २०२१ मध्ये एंगेजमेंट झाली होती –

शार्दुल ठाकूर आणि मिताली परुलकर यांची नोव्हेंबर २०२१ मध्ये एंगेजमेंट झाली होती. रोहित शर्मा आणि मालती चहर देखील त्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी हे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला. शार्दुल ठाकूरची पत्नी व्यवसायाने व्यावसायिक महिला असून ती एक स्टार्टअप कंपनी चालवते.

हेही वाचा – Rishabh Pant Comeback वर सौरव गांगुलीने दिली मोठी अपडेट; म्हणाला, ‘त्याला पुनरागमन करायला….’

शार्दुल आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार –

३१ वर्षीय शार्दुल ठाकूरने आतापर्यंत भारतासाठी आठ कसोटी, ३४ एकदिवसीय आणि २५ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान शार्दुलने कसोटीत २७, एकदिवसीय सामन्यात ५० आणि टी-२० मध्ये ३३ विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शार्दुलचा संघात समावेश करण्यात आला आहे. शार्दुल आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे.

Story img Loader