मैदानावर गोलंदाजांना घाम फोडणारा भारतीय क्रिकेटपटू आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा शिखर धवन सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याच्या पोस्टची त्याचे चाहतेही आतुरतेने वाट पाहात असतात. नुकतात इंस्टाग्रामवर त्याने एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या दोन तासात या व्हिडिओला साडे तीन लाखांहून अधिक जणांनी लाईक मिळालेत. शिखर धवनचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओखाली ‘कोण चांगलं डान्स करतो, आपल्या कमेंट्स द्या’, असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडिओ त्याने स्टीव स्मिथ, ऋषभ पंत, आर अश्विन, अजिंक्य रहाणे यांना टॅग केला आहे. नेटीझन्सही गंमतीदार कमेंट्स देत आहे. काही जणांनी तर गब्बर डान्स असल्याच्या कमेंट्स दिल्या आहेत.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी फिरकिपटू यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मासोबत त्याने डान्स केला होता. धनश्रीसोबत तो भांगडा डान्स करताना व्हिडिओत दिसला होता. गब्बरच्या स्टाइलमध्ये भांगडा असं कॅप्शन देत हा व्हिडिओ धनश्रीने इंस्टाग्राम शेअर केला होता.
View this post on Instagram
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात शिखर धवनने आक्रमक खेळीचं प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना फटकेबाजीची चांगलीच मेजवानी मिळाली होती. शिखर धवनने ५४ चेंडुत ८५ धावांची स्फोटक खेळी केली. मात्र शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात पायचीत झाला आणि शतक काही धावांनी हुकलं. असं असलं तरी त्याची खेळी दिल्लीच्या विजयात निर्णायक ठरली. दिल्लीने ७ गडी आणि ८ चेंडू राखत चेन्नईवर विजय मिळवला. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.