भारताचा दिग्गज सलामीवीर व डावखुरा तडाखेबाज फलंदाज शिखर धवन गेल्या काही काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. शिखर धवन जवळपास १० महिन्यांपूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. कोर्टात प्रलंबित असणारं त्याचं घटस्फोटाचं प्रकरण याचं एक कारण असल्याचं बोललं जात आहे. शिखर धवनला आता दिल्ली कोर्टानं मोठा दिलासा दिला असून त्याला पत्नी आएशा मुखर्जीपासून घटस्फोट मंजूर केला आहे. शिखर धवनला पत्नीकडून मानसिक त्रास दिला जात होता, हा धवनचा दावा न्यायालयानं मान्य केला आहे.

बऱ्याच काळापासून शिखर धवनच्या घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयाकडे प्रलंबित होतं. दिल्लीच्या पतियाला कुटुंब न्यायालयात शिखर धवननं घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पत्नीकडून मानसिक त्रास होत असल्याची तक्रार शिखर धवननं आपल्या याचिकेत केली होती. पत्नी आएशा मुखर्जी आपल्याला मुलाला भेटू देत नसल्याचंही शिखर धवननं याचिकेक नमूद केलं होतं. या सर्व प्रकरणाची सविस्तर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं शिखर धवनला घटस्फोट मंजूर केला आहे.

actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार
Domestic Violence Against Men
Domestic Violence : “ती माझ्या भावाला बेडरूमध्येही येऊ देत नव्हती”, तरुणीचा व्हिडिओ व्हायरल; वहिनीवर केले गंभीर आरोप

काय म्हटलं न्यायालयानं?

“शिखर धवन यांच्या पत्नीने त्याला मानसिक त्रास दिला. अनेक वर्षं मुलापासून त्यांना वेगळं ठेवलं. शिखर धवन यांच्या या आरोपांचा त्यांच्या पत्नी आएशा मुखर्जी यांनी कोणताही प्रतिवाद केलेला नाही. त्यामुळे त्यांचे हे सर्व आरोप मान्य करत मानसिक त्रासाच्या मुद्द्यावर शिखर धवन यांना घटस्फोट मंजूर करण्यात येत आहे”, असं न्यायालयानं यावेळी नमूद केलं.

शिखर धवननं ११ वर्षांपूर्वी, अर्थात ऑक्टोबर २०१२मध्ये आएशा मुखर्जीशी विवाह केला. त्यावेळी आएशाला आधीच्या पतीपासून २ मुली होत्या. २०२१ पासून त्या दोघांमध्ये सारंकाही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. स्वत: आएशानंही एका सोशल मीडिया पोस्टमध्ये घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केल्यानंतर ही चर्चा आणखीनच वाढली. शिखर धवननंही २०२३च्या सुरुवातीला इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात बोलताना या मुद्द्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

Shikhar Dhawan: टीम इंडियाच्या गब्बरने पाकिस्तानची उडवली खिल्ली, खराब क्षेत्ररणाचा VIDEO होतोय व्हायरल

“मी दुसऱ्या कुणालाही दोष देत नाही. मी वैवाहिक आयुष्यात पराभूत झालो कारण मी त्या सगळ्या गोष्टींसाठी नवीन होतो. आज मी क्रिकेटबाबत ज्या गोष्टी बोलतो, त्यांच्याबाबत मला २० वर्षांपूर्वी कदाचित माहितीही नव्हतं. अनुभवातून माणूस शिकत असतो. उद्या जर मला पुन्हा लग्न करायचं असेल, तर तेव्हा मी या सर्व गोष्टींबाबत अधिक हुशारीनं निर्णय घेईन. मला माहिती असेल की मला कशी मुलगी हवी आहे”, असं शिखर धवननं म्हटलं होतं.

काय आहे न्यायालयाचा आदेश?

घटस्फोटानंतर मुलाचा ताबा कुणाकडे असेल, हा मोठा वादाचा मुद्दा असतो. यासंदर्भात मात्र दिल्ली कुटुंब न्यायालयानं कायमस्वरूपी ताबा कुणा एकाकडे दिलेला नाही. त्याशिवाय, कोर्टानं शिखर धवनला त्याच्या त्याच्या मुलाला वेळोवेळी भेटण्याची, त्याच्याशी व्हिडीओ कॉलवर बोलण्याची परवानगी दिली आहे. तसेच, आएशा मुखर्जीनंही वेळोवेळी मुलाला भारतात आणणे, त्याच्यासोबत मुलाला मुक्कामी राहायला देणे, त्याच्या कुटुंबीयांसोबत राहाणे असे आदेश दिले आहेत. हे सर्व मुलाच्या शालेय सुट्ट्यांच्या किमान निम्मे दिवस व्हायला हवं, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Story img Loader