२५ डिसेंबर रोजी देशभरात आणि जगभरात ख्रिसमसचा सण साजरा केला जात आहे. हा जगभरातील सर्वात आवडत्या सणांपैकी एक आहे आणि भारतातही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ख्रिसमसच्या वेळी, अनेक भारतीय क्रिकेटपटू बांगलादेशमध्ये असताना, त्यांच्या पत्नी घरी आहेत आणि ख्रिसमस साजरा करत आहेत. याशिवाय या मालिकेत सहभागी नसलेले खेळाडूही आपल्या प्रियजनांसोबत या सणाचा आनंद लुटत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्मा मुलीसाठी सांताक्लॉज बनला

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर असून कुटुंबासह मुंबईत आहे. तर या सणाच्या दिवशी तो आपल्या मुलीसाठी सांताक्लॉज बनला आणि तिला आश्चर्यचकित केले. ज्याचा व्हिडिओ त्याची पत्नी रितिका सजदेवने शेअर केला आहे. यामध्ये रोहित गिफ्ट पॅक करताना दिसत आहे.

धोनीने दुबईत कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला

एमएस धोनी सध्या दुबईत आहे. त्याची पत्नी साक्षीने एका रेस्टॉरंटचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो आयपीएल लिलावाच्या दिवशी होता. त्या व्हिडिओमध्ये धोनी आणि साक्षी दिसले होते (व्हिडिओ येथे दिलेला आहे). त्यानंतर काल त्यांनी आपल्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर करताना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. साक्षीने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये ख्रिसमस पार्टीसाठी घर सजवले आहे.

सचिन तेंडुलकरने गरीब मुलांसोबत ख्रिसमस साजरा केला

तेंडुलकरांकडून गिफ्ट मिळाल्यानंतर मुलेही उत्साहात दिसली. हॅप्पी फीट होम फाउंडेशनसाठी मुलांसोबत ख्रिसमस साजरा केल्यानंतर सचिनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो मुलांसोबत क्रिकेट आणि कॅरम खेळताना दिसत आहे. सचिनने मुलांसोबत खेळतानाचा त्याचा अनुभवही व्हिडिओमध्ये शेअर केला आहे. सचिनने मुलांच्या उत्तम आरोग्य, शिक्षण, व्यावसायिक कार्यक्रम आणि रुग्णालयातील उपक्रमांमध्येही हातभार लावला. मुलांनी तेंडुलकरांची गाणीही गायली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अंजली तेंडुलकरही दिसली.

संजू सॅमसनसह इतर क्रिकेटपटूंनी अशाच पद्धतीने ख्रिसमस साजरा केला

याशिवाय भारतीय संघाचा महान खेळाडू संजू सॅमसननेही आपल्या पत्नीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो ख्रिसमसच्या झाडाजवळ बसलेला आहे. संजू व्यतिरिक्त सुरेश रैनानेही पत्नीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. तर मोहम्मद शमी ख्रिसमसला एकटा असून त्याने झाडासोबत फोटो टाकला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricketers celebrate christmas rohit becomes santa claus while dhoni is seen with daughter see how cricketers celebrate christmas avw