क्रिकेट विश्वातील ते दोघेही महान खेळाडू.. क्रिकेटच्या क्षितिजावरील एक बॅटने तळपणारा सूर्य तर दुसरा शीतल फलंदाजीने प्रतिस्पध्र्याना घायाळ करणारा चंद्र.. हे दोघेही रविवारी चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले ते अलविदा करण्यासाठीच.. या सामन्यानंतर ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ‘द वॉल’ राहुल द्रविड यांनी घेतल्याने रविवारी क्रिकेट क्षितीज सुने झाल्याचीच भावना क्रिकेट चाहत्यांच्या मनात होती.
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, पण मैदानात शिरण्यापूर्वी राजस्थानच्या खेळाडूंनी द्रविडला दोन्ही बाजूने उभे राहून मानवंदना दिली. सचिनही जेव्हा बाद होऊन पॅव्हेलियनच्या दिशेने परतला, तेव्हा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी मानवंदना दिली. क्षेत्ररक्षणाच्या वेळी जेव्हा मुंबईचा संघ मैदानात आला तेव्हा संघाच्या गटामध्ये फक्त सचिनच सूचना करत होता, त्यानंतर सचिनला ‘गार्ड ऑफ हॉनर’ देण्यात आला. सामना सुरू होण्यापूर्वी हा सामना राजस्थान आणि मुंबई यांच्यामध्ये नसून ‘क्रिकेटचा देव आणि क्रिकेटमधील अभेद्य भिंत’ यांच्यामध्ये होत असल्याचे बऱ्याच जणांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा