माजी खेळाडू एन्रिक पेरेझ डियाझ यांचे मत
ख्रिस्तियानो रोनाल्डो रिअल माद्रिद क्लबला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेचे जेतेपद पटकावून देवू शकतो, असे ठाम मत माद्रिदचे माजी बचावपटू एन्रिक पेरेझ डियाझ यांनी व्यक्त केले.
अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या अंतिम लढतीत रोनाल्डोचे खेळणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी या वेळी त्यांनी सांगितले. मंगळवारी सराव सत्रात रोनाल्डोला दुखापत झाली आणि त्यामुळे अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्धच्या अंतिम लढतीत त्याच्या खेळण्यावर संभ्रम निर्माण झाला आहे. या अटीतटीच्या लढतीत रोनाल्डो तंदुरुस्त असणे संघातील खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासारखे आहे, असेही डियाझ म्हणाले.
पॅचिन या नावाने प्रसिद्ध असलेल्या डियाझ यांनी माद्रिदकडून खेळताना १९६० व १९६६ साली युरोपियन चषक उंचावला होता आणि माद्रिद अकराव्यांदा ही कामगिरी करेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, ‘क्लबमधील सर्व खेळाडू महत्त्वाचे असतात, परंतु सद्य:स्थितीत रोनाल्डोची तंदुरुस्ती अधिक महत्त्वाची आहे. रोनाल्डो पूर्णपणे बरा झाला, तरी आम्हाला आंनद होईल. तो ठिकठाक असणे संघाच्याच फायद्याचे आहे. युरोपियन चषक स्पध्रेत खेळणे ही मोठी जबाबदारी असते आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद क्लबसाठी धोकादायक ठरू शकतात.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा