Cristiano Ronaldo Breaks Law: ख्रिस्तियानो रोनाल्डोने गेल्या आठवड्यात सौदी अरेबियाच्या क्लब अल नासरसह अडीच वर्षांचा करार केला आहे. पियर्स मॉर्गनच्या वादग्रस्त मुलाखतीनंतर मँचेस्टर युनायटेडस रोनाल्डोने आपला करार संपवला. अल नासर क्लबने सांगितल्याप्रमाणे रोनाल्डोसह २०२५ पर्यंत करार झाला आहे. आणि यासाठी त्याने पूर्ण २०० दशलक्ष युरोपेक्षा अधिक मानधन घेतलेआहे .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोनाल्डो सौदी अरेबियामध्ये खेळताना संघाची बांधणी कशी असणार याविषयी तपशील अजून समोर आलेले नाहीत. मात्र आता सौदीला जाताना रोनाल्डो आपल्या गर्लफ्रेंडसह एक मोठा कायदा मोडणार असल्याचे समजतेय. ख्रिस्तियानो रोनाल्डो व त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जसह हे एकत्र सौदी अरेबियाचा कायदा मोडणार आहे.

रोनाल्डो व जॉर्जिना हे कित्येक वर्ष एकत्र असूनही त्यांचे लग्न झालेले नाही आणि सौदी कायद्यानुसार लग्न न करता जोडप्याने एकाच घरात राहणे बेकायदेशीर आहे. कायदा असूनही, या जोडीला अधिकाऱ्यांकडून शिक्षा होणे अपेक्षित नाही. 2016 मध्ये रियल माद्रिदकडून खेळताना रोनाल्डो जॉर्जिनाला भेटला. त्यांना बेला अलाना, क्रिस्टियानो ज्युनियर, इवा आणि माटेओ अशी पाच मुलं आहेत.

दरम्यान, स्पॅनिश न्यूज एजन्सी EFE च्या मते, रोनाल्डोने जरी कायदा मोडला तरी त्याला शिक्षा होण्याची शक्यता फारच कमी आहे. EFE ने दोन सौदी वकिलांचा हवाला देत सांगितले की, “कायद्यानुसार अजूनही लग्नाशिवाय एकत्र राहण्यास परवानगी नाही मात्र अलीकडेच या नियमात फार शिथिलता आली आहे केवळ गुन्ह्यांच्या व अन्य समस्यांमध्ये या नियमाचा विचार केला जातो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cristiano ronaldo breaks big law with girlfriend georgina rogriguez illegally living in saudi arebia al nasser football club svs