वर्षांतील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूसाठीच्या बलून डी ऑर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला पोर्तुगालच्या सवरेत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पोर्तुगालच्या शंभर वर्षांच्या फुटबॉल इतिहासाताला सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून पोर्तुगाल फुटबॉल महासंघाने रोनाल्डोची निवड करण्यात आली. ११८ सामन्यांमध्ये पोर्तुगालचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या रोनाल्डोने ५२ गोल केले आहेत. ला लिगा स्पर्धेत खेळत असल्यामुळे रोनाल्डो या सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही.

Story img Loader