पोर्तुगालचा महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या मेडिरा येथील राहत्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कांस्य पुतळ्याच्या रोनाल्डोच्या पँटचा फुगीर भाग आक्षेपार्ह असल्याची टीका पोर्तुगालमधील प्रसारमाध्यमांनी केली आहे. पोर्तुगालमधील फुंचाल या भागात रोनाल्डोच्या दैदीप्यमान कारकीर्दीमुळे हा पुतळा उभारण्यात आला आहे. रोनाल्डोच्या फेसबुक पेजवरही याविषयी चर्चा सुरू झाली आहे. फ्री-किक घेताना उभ्या असलेल्या रोनाल्डोचा पुतळा रिकाडरे मडेरा वेलोसो यांनी साकारला असून ३.४ मीटर उंच पुतळ्याचे वजन ८०० किलो आहे. या टीकेनंतर रोनाल्डोने मात्र मौन बाळगले आहे. नाताळानिमित्ताने मिळालेल्या सुट्टीचा आनंद घालवण्यासाठी रोनाल्डो आपल्या कुटुंबियांसमवेत सध्या दुबईत आहे.

Story img Loader