Cristiano Ronaldo Video: दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी क्लब अल नसरमध्ये सामील झाल्यापासून त्याला अनेकवेळा सौदीच्या रीतिरिवाजांसह पाहिले गेले आहे. सौदी अरेबियावरील प्रेमाचा उल्लेखही त्यांनी मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा केला आहे. अलीकडेच फुटबॉल क्लब अल नसरने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रोनाल्डो सौदीच्या गाण्यांवर तलवारी घेऊन नाचताना दिसत आहे.
अल-नसरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसह अनेक खेळाडूंचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे सर्व खेळाडू सौदी अरेबियाच्या स्थापना दिनानिमित्त एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. अल-अरेबिया आणि अल-नासर ट्विटर खात्यानुसार, पोर्तुगीज स्टार आणि पाच वेळा जगाचा सर्वोत्तम खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी अरेबियाचा स्थापना दिवस साजरा करण्यासाठी अल-नासर क्लबच्या इतर खेळाडूंसह सौदीचे कपडे परिधान केले होते.
रोनाल्डोने ‘अल अर्दा’ या पारंपारिक सौदी तलवार नृत्यात भाग घेतला. व्हिडिओमध्ये पोर्तुगीज स्टार सौदी कॉफी पिताना आणि लोकप्रिय गाण्यांवर नाचताना दिसत आहे. याशिवाय रोनाल्डोने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील शेअर केला, ज्यामध्ये त्याने लिहिले की, “सौदी अरेबियाला स्थापना दिनाच्या शुभेच्छा.”
हेही वाचा – Akash Chopra: ‘बहुत दूर जाएगा ये खिलाडी’; ‘या’ चिमुरड्याचा आकाश चोप्राही झाला फॅन, पाहा VIDEO
रोनाल्डो म्हणाला की, सौदी अरेबियाच्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्याचा अनुभव अद्भुत होता. लक्षात ठेवा की सौदी अरेबियाचा स्थापना दिवस २२ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो, जो प्रत्यक्षात ३०० वर्षांपूर्वी सौदी राज्याच्या स्थापनेचा दिवस आहे, ज्याची औपचारिक स्थापना इमाम मुहम्मद बिन सौद यांनी १७२७ मध्ये घोषित केली होती.