रिअल माद्रिद आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो हे गेल्या चार वर्षांपासून अतूट नाते बनले होते. पण या नातेसंबंधात आता फूट पडल्याची चर्चा असून रोनाल्डोचे रिअल माद्रिदमधील भवितव्य अधांतरी दिसत आहे. माद्रिदच्या नव्या करारावर मी अद्याप स्वाक्षऱ्या केल्या नसल्याचे रोनाल्डोने सांगितले आहे.
रोनाल्डोचा रिअल माद्रिदशी असलेला करार २०१५ रोजी संपत आहे. मात्र त्याला करारबद्ध करण्यासाठी मँचेस्टर युनायटेड, पॅरिस सेंट जर्मेन आणि मोनॅको या इंग्लिश प्रीमिअर लीग आणि फ्रान्समधील संघांनी उत्सुकता दर्शवली आहे. मात्र रोनाल्डोला कोणत्याही परिस्थितीत अन्य संघांसाठी उपलब्ध नसेल, असे रिअल माद्रिदने स्पष्ट केले आहे. ‘‘नव्या करारावर चर्चा करण्यासाठी रोनाल्डो गेल्या आठवडय़ात तयार झाला होता. मात्र अद्याप रिअल माद्रिद आणि रोनाल्डो यांच्यात कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही,’’ असे रिअल माद्रिदचे अध्यक्ष फ्लोरेन्टिनो पेरेझ यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘रोनाल्डोचा करार संपण्यासाठी अद्याप दोन वर्षे बाकी आहेत. त्याने जास्तीत जास्त वर्षे रिअल माद्रिदकडून खेळावे, अशी रोनाल्डो, रिअल माद्रिदचे चाहते आणि माझी इच्छा आहे. आम्हाला रोनाल्डोसारख्या खेळाडूची नितांत गरज आहे. त्यामुळे रोनाल्डो रिअल माद्रिदला सोडचिठ्ठी देईल, असे काही लोकांना वाटत असले तरी तसे काहीही होणार नाही.’’

Story img Loader