पोर्तुगालचा अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अतिरिक्त वेळेतील (इंज्युरी टाइम) गोलच्या जोरावर त्यांना युरो चषकाच्या पात्रता फेरीतील सामन्यात डेन्मार्कवर १-० असा दिलासाजनक विजय मिळवता आला.
अतिरिक्त वेळेतील पाचव्या मिनिटाला रिकाडरे कुरेस्माच्या क्रॉसवर रोनाल्डोने हेडरच्या साहाय्याने अप्रतिम गोल साकारला. नवे प्रशिक्षक फर्नाडो सांतोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोर्तुगालचा हा पहिला विजय ठरला. शनिवारी सांतोस यांच्या प्रशिक्षकपदाच्या पहिल्या सामन्यात फ्रान्सकडून पोर्तुगालने २-१ असा पराभव पत्करला होता.
गेल्या महिन्यात पात्रता फेरीच्या ‘आय’ गटातील पहिल्या सामन्यामध्ये अल्बानियाकडून पोर्तुगालला पराभव पत्करावा लागला होता. त्या पराभवामुळे पावलो बेंटो यांना प्रशिक्षक पद सोडोवे लागले होते.
डेन्मार्कचा गोलरक्षक कॅस्पर शुमेइचेलने या वेळी चांगला बचाव केला. सामन्याच्या सातव्या मिनिटाला रोनाल्डोचा फटका त्याने अडवला, त्यानंतर काही मिनिटांनी नानीचा फटकाही त्याने शिताफीने अडवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा