रिअल माद्रिदचा अव्वल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे न सावरल्यामुळे तो शनिवारी रिअल व्हॅलॅडॉलिड संघाविरुद्ध होणाऱ्या स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात खेळू शकणार नाही. रोनाल्डोने गेल्या सात सामन्यांत तब्बल १४ गोल झळकावले आहेत. अल्मेरियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला दुखापतीचा त्रास जाणवू लागला. त्या वेळी त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्याचे एमआरआय स्कॅन काढल्यानंतर समोर आले. शुक्रवारी गालाटासारेविरुद्ध झालेल्या सामन्यातही तो खेळू शकला नाही. ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या किंग्ज चषक स्पर्धेतील रिअल माद्रिदच्या दोन सामन्यांनाही रोनाल्डो मुकण्याची शक्यता आहे.
रोनाल्डोची माघार
रिअल माद्रिदचा अव्वल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे न सावरल्यामुळे तो शनिवारी रिअल व्हॅलॅडॉलिड संघाविरुद्ध होणाऱ्या
First published on: 30-11-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cristiano ronaldo set to miss real madrid champions league