ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मँचेस्टर युनायटेडमधील वादग्रस्त कारकीर्दीचा दुसरा अंक “तात्काळ प्रभावाने” समाप्त झाला. मँचेस्टर युनायटेड क्लबने मंगळवारी जाहीर केले की त्यांचे यूएस-आधारित मालक, ग्लेझर कुटुंब, प्रीमियर लीग दिग्गजांना विकू शकतात. पोर्तुगालचा फॉरवर्ड रोनाल्डोने गेल्या आठवड्यात ओल्ड ट्रॅफर्डमधून बाहेर पडण्यासाठी टॉकटीव्हीवरील त्याच्या मुलाखतीत काही गोष्टी स्पष्ट केल्या, ज्यामध्ये त्याने सांगितले की त्याचा क्लबने “विश्वासघात” केला आहे आणि नवीन व्यवस्थापक एरिक टेन हॅगबद्दल देखील त्याला आदर नाही.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड परस्पर कराराने, तात्काळ प्रभावाने सोडणार आहे असे क्लबच्या निवेदनात म्हटले आहे. ते पुढे म्हणतात “ओल्ड ट्रॅफर्डमधील दोन स्पेलमध्ये त्याने ३४६ सामन्यांमध्ये १४५ गोल केल्याबद्दल क्लब त्याचे आभार मानतो आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो. मँचेस्टर युनायटेडमधील प्रत्येकजण एरिक टेन हॅगच्या नेतृत्वाखाली संघाची प्रगती सुरू ठेवण्यावर आणि यश मिळवून देण्यासाठी एकत्र काम करण्यावर लक्ष केंद्रित करतो.”

यानंतर रोनाल्डोने एक ट्वीट करून आभार प्रकट केले. त्यामध्ये तो म्हणतो,“मँचेस्टर युनायटेडशी झालेल्या संभाषणानंतर आम्ही आमचा करार सहमतीने वेळेआधीच संपवत आहोत. मला मँचेस्टर युनायटेड क्लब आवडतो आणि माझे चाहत्यांवर देखील प्रेम आहे, ते कधीही बदलणार नाही. तथापि, नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी हीचं माझ्यासाठी योग्य वेळ आहे असे मला वाटते. मी संघाला उर्वरित हंगामासाठी आणि भविष्यातील प्रत्येक यशासाठी शुभेच्छा देतो.”

मँचेस्टर युनायटेड नंतर ३७ वर्षाच्या रोनाल्डो कडे या क्लबचे पर्याय असतील उपलब्ध

मार्काच्या रिपोर्टनुसार, रोनाल्डोकडे अनेक क्लबकडून खेळण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. तो नेपोली बी सह सेरी ए मध्ये परत येऊ शकतो. नेपोलीचे ऐतिहासिक प्रतिस्पर्धी असलेल्या सेरी ए मध्ये युव्हेंटससाठी तो मागचे तीन हंगाम खेळला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो चेल्सीमध्ये जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. जर अहवालांवर विश्वास ठेवला जाऊ शकतो, तर चेल्सीचा नवीन मालक टॉड बोहली कोभमला त्याच्यासोबत पुढे जाण्याची इच्छा होती, परंतु तत्कालीन व्यवस्थापक थॉमस टुचेल हे पाच वेळा बॅलन डी’ओर विजेता असणाऱ्याखेळाडूला संघात स्थान देण्याच्या विरोधात होते.

हेही वाचा :   FIFA World Cup 2022: “२०२२ च्या विश्वचषकाची २०१८ च्या…” क्रोएशियाचा लुका मॉड्रिकचे सामन्याआधी मोठे विधान

रोनाल्डोचा बालपण क्लब असलेला स्पोर्टिंग सीपी क्लब देखील त्याला पुन्हा क्लबमध्ये सामील करण्यास उत्सुक आहे. २००२/२००३ च्या हंगामात अगदी सुरुवातीला रोनाल्डोने लिस्बन क्लबमध्ये युवा वर्गात प्रवेश केला होता आणि त्याच्या संघासाठी ३१ सामने खेळले आणि पाच गोल केले होते. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेव्हिड बेकहॅम, जो एमएलएस संघ इंटर मियामीचा मालक आहे, २०२३ मध्ये त्याच्या बाजूने सामील होण्यासाठी रोनाल्डोच्या थेट संपर्कात आहे. द सनच्या वृत्तानुसार, रोनाल्डोची पसंती अजूनही युरोपमध्ये राहण्याची आहे, तर त्यासाठी पीएसजी हा पर्याय असल्याचे देखील सांगितले जाते.मात्र लिओनेल मेस्सी त्याच्या बालपणीच्या बार्सिलोना क्लबमध्ये परत आला तरच हे शक्य होऊ शकते.

हेही वाचा :   ICC T20 Ranking: आयसीसी क्रमवारीत सूर्याचा जलवा कायम! विराट कोहलीची मात्र घसरण

रोनाल्डोकडे रियल माद्रिदचा देखील पर्याय उपलब्ध आहे. त्याच्या इंस्टाग्रामवरील नवीन घड्याळाच्या एका जाहिरातीच्या पोस्टमध्ये त्याने चॅम्पियन्स लीगमधील मँचेस्टर युनायटेड विरुद्ध तो रियल माद्रिद सोबत असताना केलेला गोल हेडर दर्शविला आहे. तसेच आता कतारमध्ये विश्वचषक होत असल्याने, तो भरघोस पगारासह मध्य-पूर्व क्लबपैकी एकात सामील होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. रोनाल्डोचे वय सध्या ३७ वर्षे आहे आणि तो अजून बराच काल फुटबॉल खेळू शकतो त्यामुळे तो नक्की कोणत्या क्लबमध्ये प्रवेश करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cristiano ronaldo thanks to manchester united cristiano ronaldo will have options for the club in the future avw