ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी आपल्या कारकीर्दीत एकमेकांच्या नकला करून मी कसा सर्वोत्तम आहे, हे सिद्ध करण्यात ऊर्जा वाया घालवली. त्यामुळेच कोपा अमेरिका स्पध्रेच्या अंतिम सामन्यात रडणाऱ्या मेस्सीची नक्कल युरो चषक स्पध्रेच्या जेतेपदाच्या सामन्यात रोनाल्डो करतोय की काय, हा प्रश्न सर्वाना पडणे साहजिकच आहे. सलग तीन अंतिम फेऱ्यांत पराभूत झाल्यामुळे खचलेल्या मेस्सीने निवृत्तीचा पर्याय निवडला. युरोच्या सामन्यात २५व्या मिनिटाला दुखापतीमुळे रोनाल्डोला मैदान सोडावे लागले. त्या वेळी महत्त्वाच्या लढतीत राष्ट्रीय संघासाठी काहीच करता येणार नसल्याचे दु:ख त्याच्या डोळ्यांत दिसत होते. पोर्तुगालच्या वाटय़ालाही अपयश आले असते, तर त्यानेही मेस्सीचा पर्याय निवडला असता का? ..कदाचित नसता. पण या दोन स्पर्धाच्या निमित्ताने या खेळाडूंची भावनिक बाजू जगासमोर आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

क्लब स्तरावर या दोन्ही खेळाडूंनी मिळवलेल्या यशाची तुलना होऊच शकत नाही, दोघेही शेरास सव्वाशेर आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर रोनाल्डोने एक पाऊल पुढे टाकून मेस्सीवर कुरघोडी केली. गेल्या आठवडय़ात यजमान फ्रान्सला नमवून पोर्तुगालने पहिल्यांदा युरो चषक उंचावला. पोर्तुगाल आणि रोनाल्डोचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय जेतेपद. या दोन्ही खेळाडूंना आपल्या देशाला एकदाही जेतेपद पटकावून देता आलेले नव्हते. त्यामुळेच शतकमहोत्सवी कोपा अमेरिका आणि युरो चषक स्पध्रेत या दोन्ही खेळाडूंवर लक्ष लागले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अपयशाचे चक्रव्यूह कोण भेदणार, यावर चर्चा सुरू झाल्या. मेस्सीने यापूर्वी तीन वेळा संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला होता, परंतु जेतेपदाची रेषा त्याला ओलांडण्यात अपयश आले. २००४ची युरो चषक अंतिम लढत हे रोनाल्डोचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कालपर्यंतचे एकमेव यश. त्या वेळी १९ वर्षांचा सडपातळ रोनाल्डो २०१६मध्ये जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक आहे. त्यामुळे या दोन्ही स्पर्धाचे केंद्रबिंदू मेस्सी आणि रोनाल्डो होते.

स्पध्रेतील कामगिरीची तुलना करायची झाल्यास मेस्सीला दहापैकी ९, तर रोनाल्डोला ५ गुण मिळतील. या दोन्ही खेळाडूंच्या खांद्यावर अपेक्षांचे प्रचंड ओझे होते, परंतु मेस्सीने सक्षमपणे ते पेलले. रोनाल्डो मात्र डगमगत होता. मेस्सीने आपल्या कौशल्याचा पुरेपूर वापर करून अर्जेटिनाची विजयी घोडदौड राखली, तर रोनाल्डोना मिळालेल्या संधीचे सोने करण्यात वारंवार अपयश आले. नशिबाचे पारडे त्याच्या बाजूने असल्याने तो पुढे गेला इतकेच. मेस्सीने अर्जेटिनाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून देण्यासाठी जंगजंग पछाडले. त्यामुळे तो या जेतेपदाचा दावेदार होता. पोर्तुगाल संघ नशिबाच्या जोरावर अधिक आणि थोडय़ाशा कर्तृत्वावर जिंकले. साखळी सामन्यातच त्यांना तुलनेने कमकुवत असलेल्या संघांनी धाप टाकण्यास भाग पाडले. हंगेरीविरुद्धचे दोन आणि वेल्सविरुद्धचा एक गोल हे रोनाल्डोचे युरो स्पध्रेतील कर्तृत्व. तर मेस्सीने (५ गोल) जबाबदारी स्वीकारत संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले. पण पुन्हा एकदा त्याच्या नशिबी अपयशच लिहिले होते.

रोनाल्डोला संघाने जेतेपद मिळवून दिले. युरो जिंकल्यामुळे रोनाल्डो हा मेस्सीपेक्षा यशस्वी खेळाडू आहे, असा अर्थ होतो का?.. तर नाही. कामगिरीच्या बाबतीत मेस्सी सर्वोत्तम ठरला. दोन्ही खेळाडूंनी राष्ट्रीय संघाला भरभरून दिले. अर्जेटिनाकडून खेळताना मेस्सीने ११३ सामन्यांत ५५, तर पोर्तुगालसाठी रोनाल्डोने १३३ सामन्यांत ६१ गोल केले आहेत. २०१६च्या मेस्सी-रोनाल्डोच्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकल्यास मेस्सीने ३४ गोल केले आहेत, तर २३ वेळा गोल करण्यात मदत केली. रोनाल्डोच्या खात्यात ही आकडेवारी ३२-११ अशी आहे. त्यामुळे रोनाल्डोने युरो चषक जिंकून महानता सिद्ध केली, असे म्हणणे चुकीचे ठरेल. पोर्तुगालच्या जेतेपदात त्याचा किती वाटा होता, याचे समीक्षण करायला हवे. या दोघांची तुलना काल, आज व उद्याही सुरू राहणार. यामध्ये कधी मेस्सी, तर कधी रोनाल्डो आघाडीवर राहील. पण हे एकाच क्षितिजावरील दोन ध्रुुव आहेत आणि त्यांच्यात तुलनेची चढाओढ कायम होतच राहणार आहे.

  • ख्रिस्तियानो रोनाल्डो

आंतरराष्ट्रीय : १३३ सामने, ६१ गोल, २०१६ युरो चषक

क्लब : ६७१ सामने, ४८७ गोल

जेतेपद : इंग्लिश प्रीमिअर लीग ३ (२००६-०७, २००७-०८, २००८-०९); एफए चषक : १ (२००३-०४); लीग चषक २ (२००५-०६, २००८-०९); एफ कम्युनिटी शिल्ड १ (२००७); चॅम्पियन्स लीग ३ (२००७-०८, २०१३-१४, २०१५-१६); ला लीगा १ (२०११-१२); कोपा डेल रे २ (२०१०-११, २०१३-१४);  स्पॅनिश सुपर चषक १ (२०१२); युएफा सुपर चषक १ (२०१४); फिफा क्लब विश्वचषक २ (२००८, २०१४).

  • लिओनेल मेस्सी

आंतरराष्ट्रीय : ११३ सामने, ५५ गोल, २००८ ऑलिम्पिक जेतेपद

क्लब : ५३१ सामने, ४५३ गोल

जेतेपद : ला लीगा ८ (२००४-०५, २००५-०६, २००८-२००९, २००९-१०, २०१०-११, २०१२-१३, २०१४-१५, २०१५-१६); कोपा डेल रे ४ (२००८-०९, २०११-१२, २०१४-१५, २०१५-१६); स्पॅनिश सुपर कप ६ (२००५, २००६, २००९, २०१०, २०११, २०१३); चॅम्पियन्स लीग ४ (२००५-०६, २००८-०९, २०१०-११, २०१४-१५); युएएफा सुपर कप ३ (२००९, २०११, २०१५); फिफा क्लब विश्वचषक ३ (२००९, २०११, २०१५).

वैयक्तिक पुरस्कार :  बॅलोन डी’ओर : २००९, २०१०, २०११, २०१२, २०१५

फिफा सर्वोत्तम खेळाडू : २००९

– स्वदेश घाणेकर
swadeshghanekar@expressindia.com