आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाकडून (फिफा) देण्यात येणारा फुटबॉल विश्वातील सर्वोच्च असा ‘बॅलोन डी ओर’ पुरस्कार क्रोएशियाचा कर्णधार ल्युका मॉड्रीच याला देण्यात आला. या पुरस्कारामुळे तब्बल १० वर्षानंतर हा पुरस्कार एका नव्या खेळाडूला मिळाला. गेल्या दहा वर्षात हा पुरस्कार पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी यांच्यापैकीच एकाला मिळत होता. पण अखेर तब्बल १० वर्षांनंतर फुटबॉल जगताला नवा हिरो मिळाला. पण या पुरस्काराबाबत रोनाल्डोच्या मोठ्या बहिणीने खळबळजनक आरोप केले आहेत.

यंदा देण्यात आलेला पुरस्कार हा माफियाच्या मदतीने विकत घेण्यात आला आहे, अशा आशयाचा संदेश रोनाल्डोची मोठी बहीण एल्मा अव्हेरो हिने इंस्टाग्रामवर लिहिला आहे.

तिने आपल्या पोस्टमध्ये रोनाल्डोचा फोटो शेअर केला आहे आणि त्या खाली लिहिले आहे की दुर्दैवाने आपण अशा जगात राहतो ज्या जगात माफियाचं राज्य आहे. पैशाचे प्राबल्य आहे. त्यामुळे यंत्रणा खराब झालेली दिसत आहे. पण देव हा साऱ्यावर उपाय आहे. तो या नकारात्मक शक्तींवर तोडगा आहे. तो थोडा वेळ घेत असेल पण तो कधीही अयशस्वी होत नाही, असे तिने लिहिले आहे.

Story img Loader