ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत दोन गोल लगावले आणि त्या बळावर रिअल माद्रिदने ओसासुना संघावर ४-० असा दणदणीत विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच माद्रिदच्या संघाने जोरदार आक्रमणाला सुरुवात केली आणि सहाव्याच मिनिटाला त्यांना रोनाल्डोने पहिले यश मिळवून दिले.  रोनाल्डोच्या पहिल्या गोलनंतर पहिल्या सत्रामध्ये माद्रिदला एकही गोल करता नाही आणि त्यामुळेच त्यांच्याकडे मध्यंतरापर्यंत १-० अशी आघाडी होती.
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला माद्रिदला रोनाल्डोने पुन्हा एकदा यश मिळवून दिले. सामन्याच्या ५२व्या मिनिटाला त्याने दुसरा गोल केला. रोनाल्डोनंतर सर्जियो रामोसने ६०व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी अधिक भक्कम केली. त्यानंतर डॅनियल कारव्हजलने ८३व्या मिनिटाला संघाला चौथा गोल करून दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा