Cristiano Ronaldo Youtube Channel Record: पोर्तुगालचा जगप्रसिद्ध दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो फुटबॉलमध्ये अनेक विक्रम मोडत आहे. या खेळात त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. पण आता खेळाच्या जगाबाहेरही रोनाल्डोने खास विक्रम केला आहे. रोनाल्डोने नुकतेच त्याचे यूट्यूब चॅनल लॉन्च केले आहे, ज्याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली. त्याने आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलसह एक मोठा विक्रम केला.

हेही वाचा – Rohit Sharma: ना बुमराह, ना कोहली, रोहितच्या मते ‘हे’ ३ दिग्गज टीम इंडियाचे आधारस्तंभ, T20 WC विजयाचं श्रेय देत म्हणाला…

Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
a girl child shows humanity
संस्काराशिवाय आयुष्य काहीच नाही! चिमुकलीने दाखवली माणुसकी, वृद्धी व्यक्तीला पाजले पाणी, पाहा VIDEO VIRAL
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO
Monkey hugs Shashi Tharoor, falls asleep on his lap
Shashi Tharoor : माकडानं शशी थरुरांना मिठी मारुन कुशीत काढली एक डुलकी, फोटो व्हायरल
Maharashtrian old couple emotional video
आयुष्यभर नि:स्वार्थ प्रेम करणारा जोडीदार भेटायला भाग्य लागतं! मराठमोळ्या आजी आजोबांचा VIDEO होतोय व्हायरल

रोनाल्डोचा चाहता वर्ग जगभरात किती मोठा आहे याचा प्रत्यय त्याच्या युट्यब चॅनलच्या विक्रमावरून आला आहे. त्याने YouTube वर सर्वात जलद १ मिलियन सब्सक्राइबर्सचा विक्रम मोडला. रोनाल्डोच्या युट्युब चॅनेलने अवघ्या ९० मिनिटांत १ मिलियन सबस्क्राईबर्सचा आकडा गाठला. रोनाल्डोचे आता त्या YouTube चॅनेलवर १० मिलियनहून अधिक सबस्क्राईबर झाले आहेत.

रोनाल्डोचे सोशल मीडियावरही खूप चाहते आहेत. त्याचे ट्विटरवर ११२.५ मिलियन फॉलोअर्स, फेसबुकवर १७० मिलियन आणि इंस्टाग्रामवर ६३६ मिलियन फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर रोनाल्डोइतके फॉलोअर्स कोणाचेही नाहीत. आपल्या यूट्यूब चॅनलबद्दल माहिती देताना, ख्रिस्तियानो रोनाल्डोने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, ‘प्रतीक्षा संपली आहे. माझे YouTube चॅनल आले आहे. सबस्क्राईब करा आणि माझ्या या नवीन प्रवासात सामील व्हा.

हेही वाचा – Video : रोहित शर्माला पाहताच उभा राहिला श्रेयस अय्यर! खुर्चीवरून उठला अन् केलं असं काही…; ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक

युट्युब चॅनलचे १० मिलियन सबस्क्राइबर्स आहेत त्यांना सोनेरी बटण दिले जाते. रोनाल्डोने त्याच्या चॅनलवर गोल्डन बटण असलेला व्हिडिओही शेअर केला आहे. रोनाल्डोने स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे, ज्याचे २.२७ मिलियन सबस्क्राईबर आहेत. मेस्सीने १२ वर्षांपूर्वी त्याचे चॅनल सुरू केले होते.

रोनाल्डोने सांगितले की, चाहत्यांना या चॅनलवर त्याच्या आयुष्याची एक वेगळी बाजू पाहायला मिळेल. या युट्युब चॅनलवर तो त्याचे कुटुंब, प्रशिक्षण, रिकव्हरी, शिक्षण आणि व्यवसायाशी संबंधित व्हिडिओ पोस्ट करणार आहे. रोनाल्डो म्हणाला, ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी नाते जोडणं मला नेहमीच आवडतं. यूट्यूबच्या माध्यमातून मला चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी एक मोठे व्यासपीठ मिळेल. इथे तुम्ही माझ्याबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल आणि माझे विचार जाणून घेऊ शकाल.’

हेही वाचा – Neeraj Chopra: ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा आज पुन्हा उतरणार मैदानात, डायमंड लीग स्पर्धा लाईव्ह कुठे, कधी आणि किती वाजता पाहता येणार?

सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या अल नासर क्लबकडून सौदी प्रो लीगमध्ये खेळत आहे. अलीकडेच तो युरो कप २०२४ मध्ये पोर्तुगालकडून खेळताना दिसला होता. मात्र, रोनाल्डो आपल्या संघाला जेतेपद मिळवून देऊ शकला नाही. रोनाल्डो ३९ वर्षांचा झाला आहे. त्याची कारकीर्द आता अंतिम टप्प्यात आहे. मात्र तरीही तो खूप फिट आहे.

Story img Loader