IPL 2023 Updates: एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएलच्या १६व्या हंगामात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. यामुळेच कर्णधार धोनीने स्वतः सरावाला सुरुवात केली आहे. चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये धोनी चेपॉक स्टेडियममध्ये सराव करताना दिसत आहे. सराव सत्रात धोनीचे शॉट्स पाहून सीएसके चाहत्यांना आनंद होत आहे.
चेन्नईसाठी मागचा हंगाम सर्वात खराब होता. रवींद्र जडेजाने कर्णधारपद सोडल्यानंतर या मोसमात पुन्हा एकदा धोनी कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. आयपीएलच्या १६ व्या मोसमातील सलामीच्या सामन्यात चेन्नई आणि गुजरात संघ आमनेसामने असतील. गुजरात गतविजेता असून चेन्नईसाठी हा सामना सोपा असणार नाही. बर्याच वर्षांनंतर आयपीएल यावेळी होम-अवे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. आयपीएल १५वा हंगाम सीएसकेसाठी सर्वात वाईट हंगाम होता. गुणतालिकेत संघ तळापासून दुसऱ्या स्थानावर होता.
चेन्नईला गेल्या मोसमात विसरायला आवडेल –
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नईचा गेल्या वर्षीचा आयपीएल हंगाम खूपच खराब होता. संघाने लीग सुरू होण्याच्या दोनच दिवस आधी रवींद्र जडेजाला आपला कर्णधार बनवले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाचा पहिल्या ८ पैकी ६ सामन्यात पराभव झाला होता. परिणामी जडेजाने कर्णधारपद सोडले आणि धोनीने पुन्हा कर्णधारपद स्वीकारले.
हेही वाचा – WPL 2023 MI vs GG: गुजरात जायंट्सला पहिल्याच सामन्यात मोठा धक्का; बेथ मुनीला दुखापत झाल्याने अडचणी वाढल्या
संपूर्ण हंगामात १४ पैकी केवळ ४ सामने जिंकणारा चेन्नई संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नसताना आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा असे घडले. धोनीसाठी हा आयपीएलचा शेवटचा सीझन असू शकतो, त्यामुळे तो आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.
चेन्नई सुपर किंग्ज संघ –
बेन स्टोक्स, दीपक चहर, एमएस धोनी, मोईन अली, अंबाती रायुडू, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगरगेकर, प्रशांत सोळंकी, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, महेश थेक्षाना, निशांत सिंधू, अजिंक्य प्रेहणे, अजिंक्य रहाणे, ड्वेन प्रिटोरियस. सुभ्रांशु सेनापती, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, मथीशा पाथीराना, भगत वर्मा, शेख रशीद, तुषार देशपांडे, रवींद्र जडेजा