IPL 2020मध्ये चेन्नईच्या संघाची कामगिरी फारशी चांगली होऊ शकली नाही. १४ सामन्यांमध्ये केवळ ६ विजय मिळवत त्यांना सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. IPLच्या इतिहासात प्रथमच चेन्नईच्या संघाला पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्याचसोबत महेंद्रसिंग धोनीलादेखील पहिल्यांदाच संपूर्ण हंगामात एकही अर्धशतक ठोकता आलं नाही. धोनीच्या या कामगिरीनंतर धोनी IPL मधूनही निवृत्त होणार का? असा प्रश्न उपस्थित होत असताना धोनीने त्यावर स्पष्टपणे उत्तर देत चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आता धोनी पुढच्या हंगामाच्या तयारीला लागला असल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

धोनी आणि कंपनी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात युएईत दाखल झाली होती. प्रत्येक खेळाडूला आपल्या जोडीदाराला सोबत घेऊन येण्याचे स्वातंत्र्य होते. पण चेन्नईच्या संघाने तसं केलं नाही. त्यांच्या संघातील कर्णधारासह सर्वच जण एकटे स्पर्धेसाठी दाखल झाले. पण इतर संघापेक्षा त्यांचं स्पर्धेतील आव्हान लवकर संपुष्टात आलं. त्यामुळे धोनीचा संघ लवकर भारतात परतला. मैदानावर दुहेरी धावा काढताना काहीसा थकलेला धोनी भारतात परतल्यावर पहिला जिममध्ये गेल्याचं दिसून आलं. धोनी आपल्या भावासोबत जिममध्ये धडकला आणि त्याने २०२१ च्या IPL च्या दृष्टीने वर्कआऊटलादेखील सुरूवात केली.

पाहा धोनीचा व्हायरल झालेला फोटो…

दरम्यान, “धोनी आणि चेन्नई संघाचा यंदाचा हंगाम फारसा चांगला गेला नाही. मी म्हणेन की हे एक वाईट वर्ष होतं. धोनीने संघातील बदलाबाबत काही गोष्टी सामन्यानंतरच्या कार्यक्रमात सांगितल्या. त्या बोलण्यामागे त्याचा नक्की काय हेतू होता हे मला चांगलंच माहिती आहे. त्याने या सर्व गोष्टींबाबत माझ्याशी चर्चा केलेली आहे. धोनी संघाचा कर्णधार होता आणि तो यापुढेही संघाचं नेतृत्व करत राहील”, असे CSKचे मालक श्रीनिवासन यांनी स्पष्ट केलं आहे.

Story img Loader