IPL Auction 2024, MS Dhoni: आयपीएलच्या पुढील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव करण्यात आला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. पाच वेळा ट्रॉफी जिंकणारा चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा असतील. तो आतापर्यंत एकाही हंगामासाठी बाहेर गेला नाही. वयाच्या ४२व्या वर्षी तो चेन्नईचे कर्णधारपदासाठी सज्ज झाला आहे. मात्र, हा त्याचा शेवटचा सीझन असू शकतो, असे बोलले जात आहे. चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी यावर आपले मत मांडले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चाहत्यांमध्ये उत्सुकता कायम ठेवत कासी विश्वनाथन म्हणाले की, “ही त्याची शेवटची आवृत्ती असेल की नाही हे फक्त धोनीच सांगू शकतो.” ते एका मुलाखतीत पुढे म्हणाले की, “मला ते माहित नाही. बघा, हा कर्णधाराचा प्रश्न आहे, तो तुम्हाला थेट उत्तरे देईल. माही तुम्हाला तो काय करणार आहे हे सांगत नाही तोपर्यंत मी देखील काहीही सांगू शकत नाही.” धोनीच्या गुडघ्यावर यावर्षी जूनच्या सुरुवातीला शस्त्रक्रिया झाली होती. सध्या धोनी रिहॅबिलीटेशनवर लक्ष्य केंद्रित करत आहे, तो आयपीएल २०२४ पूर्वी फिट होईल अशी अपेक्षा आहे.

धोनी लवकरच फलंदाजीचा सराव सुरू करणार आहे

काशी विश्वनाथन धोनीच्या फिटनेसबद्दल म्हणाले, “तो आता चांगली कामगिरी करत आहे.फिटनेसवर्क सुरू केले आहे. धोनीने जिममध्ये जाण्यास सुरुवात केली असून, येत्या १० दिवसांत तो नेटमध्येही सराव सुरू करेल.” धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स गेल्या वर्षी चॅम्पियन बनली होती. त्यांनी गुजरात टायटन्सचा त्यांच्या होम ग्राउंड नरेंद्र मोदी स्टेडियमवर पराभव केला.

हेही वाचा: IND W vs AUS W: हरमनप्रीत कौर आणि अ‍ॅलिसा हिली यांच्यात शाब्दिक चकमक, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

या लिलावात चेन्नईने सहा खेळाडू विकत घेतले

इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद कायम राखू पाहणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने १९ डिसेंबर रोजी दुबई येथे खेळाडूंच्या लिलावात सहा खेळाडूंना खरेदी केले. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू डॅरिल मिचेलसाठी संघाने १४ कोटी रुपये खर्च केले. फ्रँचायझीने अनकॅप्ड भारतीय फलंदाज समीर रिझवीला ८.४ कोटी रुपयांना विकत घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. दुसरीकडे, शार्दुल ठाकूरला ४ कोटी रुपयांना संघात खरेदी केले.

रिटेन केलेले खेळाडू: एम.एस. धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), मोईन अली, दीपक चाहर, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, राजनाथ चौधरी, राजनाथ पाटील. शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश तिक्षणा.

लिलावात विकत घेतले: रचिन रवींद्र (१.८० कोटी), शार्दुल ठाकूर (४ कोटी), डॅरिल मिचेल (१४ कोटी), समीर रिझवी (८.४० कोटी), मुस्तफिजुर रहमान (२ कोटी), अरावेली अवनीश (२० लाख).

हेही वाचा: IND W vs AUS W: भारतीय महिला संघाची ऐतिहासिक कामगिरी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा पहिलाच विजय

भूमिकेनुसार संपूर्ण टीम

सलामीवीर: डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र

मध्यक्रम: समीर रिझवी, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शेख रशीद, अरावेली अवनीश

अष्टपैलू: रवींद्र जडेजा, डॅरिल मिचेल, मोईन अली, शिवम दुबे, निशांत सिंधू, अजय मंडल

वेगवान गोलंदाज: दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना, मुकेश चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, मुस्तफिजुर रहमान.

फिरकीपटू : महेश तिक्षणा, मिचेल सँटनर, प्रशांत सोलंकी

संभाव्य प्लेईंग११

ऋतुराजगायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एम.एस. धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), दीपक चहर, महेश तिक्षणा, मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे/शार्दुल ठाकूर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csk ceo gave latest update on ms dhonis ipl future told when mahi will start training avw