CSK CEO Kasi Viswanathan has reacted to the controversy between Jadeja-Dhoni: सीएसकेने आयपीएल २०२३ मध्ये त्यांचे पाचवे विजेतेपद जिंकले. त्याचबरोबर मुंबई इंडियन्ससह संयुक्तपणे स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनला आहे. सीएसकेने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचवे विजेतेपद पटकावले. या विजयात महत्त्वाचे योगदान रवींद्र जडेजाचे होते, ज्याने शेवटच्या दोन चेंडूत १० धावा काढून सामना जिंकून दिला. आता सीएसकेच्या सीईओंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फायनलनंतर एमएस धोनीने आनंदाने जडेजाला खांद्यावर उचलले. हा फोटो अनेकांचा पोस्टर फोटो बनला. लोकांना तो खूप आवडला आणि यानंतर वादाच्या सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाला. त्यानंतर जडेजाने हे जेतेपद धोनीला समर्पित केले. पण लीग मॅचनंतर जडेजा आणि धोनीचा व्हायरल झालेला व्हिडिओ, कर्मासारख्या गोष्टींवर त्यांचे ट्विट आणि प्रेझेंटेशन सोहळ्यात त्याला शुभेच्छा देणार्‍या प्रेक्षकांचा कटाक्ष, यामुळे या अनुमानांना काहीसा विश्वास बसतो. आता सीएसकेच्या सीईओने ईएसपीएन क्रिकइंफोला दिलेल्या मुलाखतीत याबाबत स्पष्ट विधान केले आहे.

सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी स्पष्टपणे सांगितले की, “जडेजाला माहित होते की धोनी त्याच्या पाठोपाठ फलंदाजीला येतो. धोनी जेव्हा कधी मैदानात येतो किंवा येणार असतो तेव्हा त्याचे स्वागत करण्याची ही प्रेक्षकांची पद्धत आहे. जडेजाला याचे वाईट वाटले असेल. अशा परिस्थितीत कोणत्याही खेळाडूवर दबाव येऊ शकतो. मात्र त्यांनी याबाबत तक्रार न करता ट्विट केले. हे खेळात चालते.”

हेही वाचा – TNPL 2023: सी सरथ कुमारच्या शॉटने चाहत्यांना झाली सूर्यकुमार यादवची आठवण, पाहा VIDEO

सीएसकेचे सीईओ पुढे म्हणाले, “फायनल सामन्यानंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आले होते, ज्यापैकी एकात मी जडेजाशी बोलत असल्याचे दिसून आले होते. ते ज्याप्रकारे दाखवले त्याप्रमाणे काहीच नव्हते. मी त्याच्याशी सामन्याबद्दल बोलत होतो आणि दुसरा कोणताही मुद्दा नव्हता. संघातील वातावरण सर्वांनाच माहीत आहे, ड्रेसिंग रूममधील वातावरण छान आहे. कोणाला काही अडचण नाही. तो धोनीचाही खूप आदर करतो. अंतिम फेरीतही सामना जिंकल्यानंतर त्याने जेतेपद धोनीला समर्पित केले.”

फायनल जिंकल्यानंतर धोनीचे शब्द काय होते?

काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, “धोनी म्हणाला होता, पाहा पाचवे जेतेपद आले आहे. त्यानंतर त्याने रवींद्र जडेजाचे कौतुक केले आणि त्याच्या आत्मविश्वासाचेही कौतुक केले. अहमदाबाद हे जडेजासाठी घरच्या मैदानासारखे होते. तो एक अतिशय निवांत क्षण होता. सर्वांना माहित आहे की २०१२ मध्ये धोनीने जडेजाची सीएसके एंट्री केली होती. येथे मोठा झालेला खेळाडू आपल्या संघाच्या विजेतेपदाचा हिरो ठरल्याने त्याला दिलासा मिळाला.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csk ceo kasi viswanathan has reacted to the controversy between ravindra jadeja and ms dhoni vbm
Show comments