MS Dhoni Joking on Comedian Yogi Babu: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटनंतर चित्रपटांच्या दुनियेत प्रवेश केला आहे. तो त्याच्या प्रोडक्शन हाऊस धोनी एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली पहिला चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात दक्षिण भारतीय अभिनेता योगी बाबू सहाय्यक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या एका कार्यक्रमात महेंद्रसिंग धोनीने अभिनेता योगी बाबूची खूप मस्करी केली. ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या मान्यवरांना हसू आवरले नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

धोनीच्या प्रोडक्शन बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटात दक्षिणेतील कलाकार दिसणार आहेत. यामध्ये हरीश कल्याण आणि इवाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश थमिलमनी केले आहे. लेट्स गेट मॅरीड असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट धोनी एंटरटेनमेंट कंपनीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. धोनी म्हणाला की, हा चित्रपट सर्व लोकांसाठी बनवला आहे. तुम्ही तुमच्या मुलांसोबतही हा चित्रपट पाहू शकता.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Aata Hou De Dhingana Season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अद्वैतने कलासाठी आणली सवत; पतीला जिंकण्यासाठी कला लावतेय ताकद…; व्हिडीओ व्हायरल
Shiva
Video: “माझा होकार…”, आशूने नेहाबरोबरच्या लग्नासाठी दिला होकार; ‘शिवा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Irfan Pathan Showed how Cameraman zoom on fans during live cricket match watch video
Irfan Pathan : लाइव्ह मॅचमध्ये चाहत्यांवर कसा झूम होतो कॅमेरा? इरफान पठाणने शेअर केला खास VIDEO
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या

या कार्यक्रमात धोनी स्टेजवर आला आणि लोकांना खूप हसवले. केवळ लोकांनाच नाही तर धोनीने कॉमेडियन योगी बाबूसोबत मस्ती केली आणि त्यालाही हसवले. धोनी म्हणाला, “बातमी वाचली की, तुम्ही (योगी बाबू) म्हणाला होता की तुम्हाला चेन्नई सुपर किंग्जच्या संघात यायचे आहे.”

यानंतर एमएस धोनी पुढे म्हणाला, “अंबाती रायुडू गेल्यानंतर आमच्या संघात जागा रिक्त आहे, तुम्ही येऊ शकता. पण एक अडचण आहे. तुमची शीट नेहमी भरली असते. त्यामुळे मला तुम्हाला कॉल करून विचारावे लागेल की उद्या सामना आहे आणि तुम्ही फ्री आहात का? बरं, मी व्यवस्थापनाशी बोलेन. पण मी तुम्हाला सांगतो की, तिथे गोलंदाज खूप वेगवान गोलंदाजी करतात. त्यांना नेहमी फलंदाजाच्या हेल्मेटला मारायचे असते.”

हेही वाचा – Ashes Series 2023: ‘हा आमच्यासाठी खूप कठीण क्षण…’, चौथ्या सामन्यानंतर बेन स्टोक्सची प्रतिक्रिया

धोनी आयपीएल २०२४ चा हंगाम खेळणार –

आयपीएल २०२३ सुरू होण्यापूर्वीच हा सीझन धोनीचा शेवटचा सीझन असू शकतो, अशा बातम्या येत होत्या. मात्र, पाचवे आयपीएल विजेतेपद पटकावल्यानंतर धोनी म्हणाला की, त्याच्या चाहत्यांसाठी त्याला आयपीएलचा आणखी एक हंगाम खेळायचा आहे. आयपीएल २०२३ मध्ये धोनीने १२ डावात १८२.४५ च्या स्ट्राइक रेटने १०४ धावा केल्या आहेत.

Story img Loader