३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी ICC ने समालोचकांची यादी जाहीर केली आहे. भारताच्या तिघांना या यादीमध्ये स्थान मिळालं आहे. सौरव गांगुली, संजय मांजरेकर आणि प्रसिद्ध मराठमोळे समालोचक हर्षा भोगले यांना ICC च्या यादीत स्थान मिळालं आहे. विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
ICC कडून जाहीर करण्यात आलेली समालोचकांची यादी –
नासिर हुसेन, इयन बिशॉप, सौरव गांगुली, मेलेनी जोन्स, कुमार संगकारा, मायकल अथर्टन, अॅलिसन मिचेल, ब्रेंडन मॅक्युलम, ग्रॅम स्मिथ, वासिम अक्रम, शॉन पोलॉक, मायकल स्लेटर, मार्क निकोलस, मायकल होल्डींग, इशा गुहा, पॉमी एमबान्ग्वा, संजय मांजरेकर, हर्षा भोगले, सायमन डुल, इयन स्मिथ, रमीझ राजा, अथर अली खान आणि इयान वार्ड