CWG 2022 Ind Vs Aus Gold Medal Match Updates in Marathi: बर्मिंगहॅम येथे सुरू असलेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. महिलांच्या टी २० क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना पार पडला. या रंगतदार सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा अवघ्या नऊ धावांनी पराभव करून सुवर्ण पदक जिंकले. परिणामी भारतीय मुलींना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले लक्ष्य पार करण्यासाठी उतरलेल्या भारताला सर्वबाद १५२ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यापूर्वी, कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बेथ मूनीच्या अर्धशतकाच्या बळावर निर्धारित २० षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने आठ बाद १६१ धावा केल्या आहेत. एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर ही सुवर्ण पदकाची लढत आयोजित करण्यात आली होती. उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा तर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता.

Live Updates

Commonwealth Games 2022, Ind W Vs Aus W Gold Medal Match Live: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यातील सर्व अपडेट्स

00:36 (IST) 8 Aug 2022
सहा चेंडूंत ११ धावांची आवश्यकता

भारताला विजयासाठी सहा चेंडूंत ११ धावांची आवश्यकता आहे.

00:26 (IST) 8 Aug 2022
भारताचा सहावा गडी बाद झाला आहे

स्नेह राणाच्या रुपात भारताचा सहावा गडी बाद झाला आहे. भारताला विजयासाठी २३ धावांची आवश्यकता आहे.

00:09 (IST) 8 Aug 2022
भारताचा तिसरा गडी बाद

जेमिमाहच्या रुपात भारताचा तिसरा गडी बाद झाला आहे. भारताला विजयासाठी ४४ धावांची आवश्यकता आहे.

00:06 (IST) 8 Aug 2022
सामना रंगतदार स्थितीमध्ये

सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहचला आहे. भारताला विजयासाठी ५० धावांची आवश्यकता आहे.

23:39 (IST) 7 Aug 2022
भारताचे अर्धशतक पूर्ण

आठव्या षटकामध्ये भारतीय संघाच्या ५० धावा पूर्ण झाल्या आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्ज डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

23:27 (IST) 7 Aug 2022
चार षटकांमध्ये भारताच्या दोन बाद २३ धावा

चार षटकांमध्ये भारताच्या दोन बाद २३ धावा झाल्या आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्ज खेळपट्टीवर उपस्थित आहेत.

23:22 (IST) 7 Aug 2022
भारताचे दोन्ही सलामीवीर तंबूत

शफाली वर्माच्या रुपात भारताचा दुसरा गडी बाद झाला आहे. शफाली ११ धावा करून माघारी परतली.

23:18 (IST) 7 Aug 2022
मंधानाच्या रुपात भारताला पहिला धक्का

स्मृती मंधानाच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला आहे. ती अवघ्या सहा धावा करून बाद झाली. भारताच्या दोन षटकांमध्ये एक बाद १६ धावा झाल्या आहेत.

23:08 (IST) 7 Aug 2022
भारताच्या फलंदाजीला सुरुवात

भारताच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे. सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफला वर्मा मैदानात उतरल्या आहेत.

23:03 (IST) 7 Aug 2022
भारतासमोर विजयासाठी १६२ धावांचे लक्ष्य

बेथ मूनीच्या अर्धशतकाच्या बळावर निर्धारित २० षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने आठ बाद १६१ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताला १६२ धावा कराव्या लागणार आहेत.

22:54 (IST) 7 Aug 2022
अलाना किंग एक धाव करून माघारी

ऑस्ट्रेलियाचा सातवा गडी बाद. अलाना किंग एक धाव करून माघारी परतली आहे.

22:49 (IST) 7 Aug 2022
ऑस्ट्रेलियाचा सहावा गडी बाद

बेथ मूनीच्या रुपात ऑस्ट्रेलियाचा सहावा गडी बाद झाला आहे. दीप्ती शर्माने एकाच हाताने अप्रतिम झेल टिपला.

22:46 (IST) 7 Aug 2022
ऑस्ट्रेलियाचा पाचवा गडी बाद

ग्रेस हॅरिसच्या रुपात ऑस्ट्रेलियाचा पाचवा गडी बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या १७ षटकांमध्ये पाच बाद १३८ धावा झाल्या आहेत.

22:41 (IST) 7 Aug 2022
बेथ मूनीचे अर्धशतक

सलामीवीर बेथ मूनीने अर्धशतक पूर्ण केले आहे. हे तिच्या कारकिर्दीतील १३वे अर्धशतक ठरले आहे.

22:39 (IST) 7 Aug 2022
ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी बाद

अशले गार्डनरच्या रुपात ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी बाद झाला आहे. तिने २५ धावा केल्या.

22:37 (IST) 7 Aug 2022
१५ षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तीन बाद १२५ धावा

१५ षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तीन बाद १२५ धावा झाल्या आहेत. बेथ मूनी अर्धशतकाच्या जवळ पोहचली आहे.

22:26 (IST) 7 Aug 2022
ताहलिया मॅकग्रा स्वस्तात माघारी

ताहलिया मॅकग्राच्या रुपात ऑस्ट्रेलियाचा तिसरा गडी बाद झाला आहे. राधा यादवने तिचा अप्रतिम झेल टिपला. ऑस्ट्रेलियाच्या १२ षटकांमध्ये तीन बाद धावा ९९ झाल्या आहेत.

22:20 (IST) 7 Aug 2022
कर्णधार मेग लॅनिंग बाद

कर्णधार मेग लॅनिंगच्या रुपात ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला आहे. तिने ३६ धावा केल्या.

22:14 (IST) 7 Aug 2022
१० षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एक बाद ८३ धावा

१० षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एक बाद ८३ धावा झाल्या आहेत. बेथ मूनी आणि कर्णधार मेग लॅनिंग यांनी फटकेबाजी सुरू केली आहे.

22:06 (IST) 7 Aug 2022
ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक पूर्ण

आठव्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाचा धावफलक पन्नाशीपार गेला आहे. आठ षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एक बाद ५४ धावा झाल्या आहेत.

21:53 (IST) 7 Aug 2022
पाच षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एक बाद ३० धावा

पाच षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एक बाद ३० धावा झाल्या आहेत. कर्णधार लॅनिंग डावाला आकार देण्याचा प्रयत्न करत आहे.

21:45 (IST) 7 Aug 2022
तीन षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एक बाद १४ धावा

तीन षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एक बाद १४ धावा झाल्या आहेत. बेथ मूनी आणि कर्णधार मेग लॅनिंग खेळपट्टीवर उपस्थित आहेत.

21:43 (IST) 7 Aug 2022
ऑस्ट्रेलियाचा पहिला गडी बाद

ऑस्ट्रेलियाचा पहिला गडी स्वस्तात बाद झाला आहे. सलामीवीर अ‍ॅलिसा हेली रेणूका सिंग ठाकूरच्या गोलंदाजीवर पायचित झाली. भारतीय संघाने डीआरएसची मदत घेतली होती.

21:35 (IST) 7 Aug 2022
पहिल्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद सहा धावा

पहिल्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद सहा धावा झाल्या आहेत. रेणूका सिंग ठाकूरने पहिले षटक फेकले.

21:29 (IST) 7 Aug 2022
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू झाली आहे. सलामीवीर अ‍ॅलिसा हेली आणि बेथ मुनी खेळपट्टीवर आल्या आहेत.

21:24 (IST) 7 Aug 2022
राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ मैदानात

राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ मैदानात दाखल झाले आहेत. प्रथम ऑस्ट्रेलियाचे आणि नंतर भारतीय राष्ट्रगीत गायले जात आहे.

21:20 (IST) 7 Aug 2022
असे असतील संघ

भारतीय संघ: स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), स्नेह राणा, पूजा वस्त्राकार, राधा यादव, मेघना सिंग, रेणुका ठाकूर

ऑस्ट्रेलिया संघ: अ‍ॅलिसा हेली (यष्टीरक्षक), बेथ मुनी, मेग लॅनिंग (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, रॅचेल हेन्स, अॅशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन

21:16 (IST) 7 Aug 2022
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी

ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

21:12 (IST) 7 Aug 2022
नाणेफेकीला उशीर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातील नाणेफेकीला काही कारणास्तव उशीर झाला आहे.

20:39 (IST) 7 Aug 2022
ऑस्ट्रेलियाची सातत्यपूर्ण कामगिरी

ऑस्ट्रेलियाच्या संघाने गेल्या काही दिवसात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. या संघाने गेले पाच टी २० सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे.

Story img Loader