CWG 2022 Ind Vs ENG 1st Semi Final Cricket Match Updates in Marathi: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुरू असलेल्या महिला टी २० क्रिकेटचा उपांत्य फेरीतील पहिला सामना आज खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर दिमाखदार विजय मिळवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रेवश केला आहे. बर्मिंगहॅम येथील एजबस्टन क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली होती. निर्धारित २० षटकांमध्ये भारताने चार बाद १६४ धावा केल्या होत्या. स्मृती मंधानाने ३२ चेंडूत ६१ धावा फटकावल्या. हरमनप्रीत कौर नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये प्रवेश करताना केवळ एक सामना गमावला होता. अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे भारताचे पदक निश्चित झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा