CWG 2022 Ind Vs Aus 1st T20 Cricket Match Updates in Marathi : २०२२ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये महिला टी २० क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यातील पहिल्याच सामन्यात भारतासमोर जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. इंग्लंडमधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन गडी राखून परावभ केला. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. निर्धारित २० षटकांमध्ये भारतीय संघाने आठ बाद १५४ धावा केल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Commonwealth Games 2022 Day 1 Updates, Ind W Vs Aus W 1st T20 Live : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी २० सामन्यातील सर्व अपडेट्स

18:32 (IST) 29 Jul 2022
भारताचा पराभव

ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन गडी राखून पराभव केला.

18:15 (IST) 29 Jul 2022
ऑस्ट्रेलियाचा सातवा गडी बाद

जेस जोनासनच्या रुपात ऑस्ट्रेलियाचा सातवा गडी बाद झाला आहे. कांगारूंना विजयासाठी ३४ चेंडूत ४५ धावांची आवश्यकता आहे.

18:08 (IST) 29 Jul 2022
ऑस्ट्रेलियाचा सहावा गडी बाद

ऑस्ट्रेलिया सहावा गडी बाद झाला आहे. हॅरिस ग्रेस ३७ धावा करून बाद झाली. मेघना सिंगने तिला हरमनप्रीत करवी झेलबाद केले.

17:56 (IST) 29 Jul 2022
१० षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद ६६ धावा

१० षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद ६६ धावा झाल्या आहेत. विजयासाठी कांगारूंना आणखी ८९ धावांची आवश्यकता आहे.

17:49 (IST) 29 Jul 2022
ऑस्ट्रेलियाचा पाचवा गडी बाद

रॅचेल हेन्सच्या रुपात ऑस्ट्रेलियाचा पाचवा गडी बाद. ऑस्ट्रेलियाच्या आठ षटकांमध्ये पाच बाद ५५ धावा झाल्या आहेत.

17:36 (IST) 29 Jul 2022
पाच षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या चार बाद ३८ धावा

पाच षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या चार बाद ३८ धावा झाल्या आहेत.

17:34 (IST) 29 Jul 2022
ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी बाद

ताहलिया मॅकग्राच्या रुपात ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी बाद झाला आहे. रेणूका सिंगच्या गोलंदाजीवर ती बाद झाली.

17:28 (IST) 29 Jul 2022
ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला

ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात अतिशय वाईट झाली आहे. बेथ मूनीला रेणूका सिंगने त्रिफळाचित केले आहे. ऑस्ट्रेलियाची अवस्था तीन बाद २१ अशी झाली आहे.

17:23 (IST) 29 Jul 2022
ऑस्ट्रेलियाचा दुसरा गडी बाद

तिसऱ्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाचा दुसरा गडी बाद झाला आहे. कर्णधार मेग लॅनिंग आठ धावा करून बाद झाली आहे.

17:20 (IST) 29 Jul 2022
दोन षटकांंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एक बाद २० धावा

पहिल्या दोन षटकांंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एक बाद २० धावा झाल्या आहेत.

17:12 (IST) 29 Jul 2022
ऑस्ट्रेलियाला पहिला झटका

ऑस्ट्रेलियायाला पहिल्या षटकामध्ये पहिला झटका बसला आहे. यष्टीरक्षक एलिसा हेली शून्यावर बाद झाली आहे.

17:10 (IST) 29 Jul 2022
ऑस्ट्रेलियासमोर १५५ धावांचे आव्हान

निर्धारित २० षटकांमध्ये भारतीय संघाने आठ बाद १५४ धावा केल्या आहेत.

16:55 (IST) 29 Jul 2022
राष्ट्रकुल स्पर्धेत हरमनप्रीतचे ऐतिहासिक पहिले अर्धशतक

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने अर्धशतक केले. राष्ट्रकुल स्पर्धेतील हे पहिले ऐतिहासिक अर्धशतक ठरले.

16:52 (IST) 29 Jul 2022
भारताचा सहावा गडी बाद

हरलीन देओलच्या रुपात भारताचा सहावा गडी बाद झाला आहे.

16:50 (IST) 29 Jul 2022
१८ षटकांमध्ये भारताच्या पाच बाद १३६ धावा

१८ षटकांमध्ये भारताच्या पाच बाद १३६ धावा झाल्या आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौरने आक्रमक धोरण स्वीकारले आहे.

16:41 (IST) 29 Jul 2022
दीप्ती शर्मा स्वस्तात बाद

दीप्ती शर्मा स्वस्तात बाद झाली आहे. तिने अवघी एक धाव केली. भारताच्या १६ षटकांमध्ये पाच बाद ११७ धावा झाल्या आहेत.

16:39 (IST) 29 Jul 2022
जेमिमाह रॉड्रिग्ज झेलबाद

जेमिमाह रॉड्रिग्जच्या रुपात भारताचा चौथा गडी बाद झाला आहे. जेमिमाह जेस जोनासनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली.

16:29 (IST) 29 Jul 2022
भारताचा धावफलक शंभरीपार

१४व्या षटकामध्ये तीन गड्यांच्या बदल्यात भारताच्या १०० धावा पूर्ण झाल्या आहेत.

16:22 (IST) 29 Jul 2022
शफाली वर्माचे अर्धशतक हुकले

शफाली वर्माच्या रुपात भारताचा तिसरा गडी बाद झाला. ३३ चेंडूत ४८ धावा करणाऱ्या अर्धशतक थोडक्यात हुकले. भारताच्या १२ षटकांमध्ये तीन बाद ९४ धावा झाल्या आहेत.

16:13 (IST) 29 Jul 2022
१० षटकांमध्ये भारताच्या दोन बाद ७५ धावा

१० षटकांमध्ये भारताच्या दोन बाद ७५ धावा झाल्या आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि शफाली वर्मा मैदानावरती उपस्थित आहेत.

16:10 (IST) 29 Jul 2022
भारताचा दुसरा गडी माघारी

यास्तिका भाटियाच्या रुपात भारताचा दुसरा गडी बाद झाला आहे. यास्तिकाने आठ धावा केल्या.

16:08 (IST) 29 Jul 2022
शफाली वर्माला जीवदान

नवव्या षटकामध्ये शफाली वर्माला पंचांकडून जीवदान मिळाले. भारताच्या नऊ षटकांमध्ये एक बाद ६८ धावा झाल्या आहेत.

15:59 (IST) 29 Jul 2022
भारताचे अर्धशतक पूर्ण

आठव्या षटकामध्ये भारताचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. भारताने आठ षटकांंमध्ये एक बाद ५१ धावांपर्यंत मजल मारली आहे.

15:50 (IST) 29 Jul 2022
पाच षटकांमध्ये भारताच्या एक बाद ३० धावा

पहिल्या पाच षटकांमध्ये भारताच्या एक बाद ३० धावा झाल्या आहेत. सलामीवीर स्मृती मंधानाच्या रुपात भारताचा पहिला गडी बाद झाला आहे.

15:45 (IST) 29 Jul 2022
भारताला पहिला धक्का

स्मृती मंधानाच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला आहे. स्मृती २४ धावा करून बाद झाली.

15:40 (IST) 29 Jul 2022
तीन षटकांमध्ये भारताच्या बिनबाद १७ धावा

तीन षटकांमध्ये भारताच्या बिनबाद १७ धावा झाल्या आहेत. भारतीय सलामीवीरांनी सावध सुरुवात केली आहे.

15:31 (IST) 29 Jul 2022
भारताच्या फलंदाजीला सुरुवात

भारताच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे. भारतीय सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा मैदानावरती उतरल्या आहेत.

15:21 (IST) 29 Jul 2022
असे असतील संघ

भारतीय संघ: स्मृती मंधाना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, रेणुका ठाकूर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंग, हरलीन देओल

ऑस्ट्रेलिया महिला संघ: एलिसा हेली (यष्टीरक्षक), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, रॅचेल हेन्स, अॅशले गार्डनर, जेस जोनासन, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन, ग्रेस हॅरिस.

15:15 (IST) 29 Jul 2022
नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

15:10 (IST) 29 Jul 2022
मेघना सिंगचे टी २० पदार्पण

गोलंदाज मेघना सिंग टी २० पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. आजच्या सामन्यात तिला संधी देण्यात आली आहे.