PV Sindhu CWG 2022 Final: इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये २२वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये २८ जुलैपासून सुरू झालेली ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताची महिला बॅडमिंटनपटू सिंधूने धडाकेबाज कामगिरी केली आहे. सिंधूने महिला एकेरीचे विजतेपद पटकावले आहे. त्यामुळे बॅटमिंटनमध्ये भारताला यावर्षीचे पहिले सुवर्णपदक मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कॅनाडाची मिशेल ली आणि भारताची पीव्ही सिंधू यांच्यादरम्यान महिला एकेरीचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात सिंधून मिशेल लीचा २१-१५,२१-१३ अशा फरकाने पराभव केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे सिंधूचे पहिले सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक ठरले आहे. यापूर्वी, २०१४मध्ये ग्लासगो येथे आणि २०१८मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धांमध्ये तिने अनुक्रमे कांस्य आणि रौप्यपदक पटकावले होते.

रविवारी (७ ऑगस्ट) झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीतील सामन्यात पीव्ही सिंधूने जबरदस्त खेळ दाखवला होता. तिने सिंगापूरच्या वाई जिया मिनचा २१-१९, २१-१७ असा पराभव करून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते. सिंगापूरची खेळाडू जिया मिनने सिंधूला कडवी झुंज दिली होती.

हेही वाचा – विश्लेषण: राष्ट्रकुलसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून खेळाडू बेपत्ता का होतात? ‘ही’ आहेत कारणे

पीव्ही सिंधूने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्याही अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यावेळी अंतिम फेरीत सायना नेहवाल आणि सिंधूचा सामना झाला होता. सायनाने सिंधूचा पराभव केला होता. त्यामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.