इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत भारताची चांगली कामगिरी सुरू आहे. खेळांच्या पाचव्या दिवशी भारताने लॉन बॉल खेळामध्ये ‘ना भूतो ना भविष्यती’ कामगिरी केली आहे. भारतीय महिला लॉन बॉल संघाने स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सुवर्ण पदक पटकावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारताच्या महिलासंघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १७-१० असा पराभव करून ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. लवली चौबे, रूपा राणी टिर्की, पिंकी आणि नयनमोनी सैकिया या चौघींनी शानदार कामगिरी करून इतिहास रचला.

भारतीय महिलांच्या ‘फोर टीम’ने उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर १६-१३ अशी मात केली होती. या सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण, नंतर त्यांनी चांगली आघाडी घेतली. या सामन्यात लवली चौबे (नेतृत्व), पिंकी (द्वितीय), नयनमोनी सेकिया (तृतीय) आणि रूपा राणी टिर्की (स्किप) यांनी प्रभावी कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला होता.

हेही वाचा – CWG 2022: धक्कादायक! स्पर्धा सुरू असताना भारतीय सायकलपटूच्या अंगावरून गेली सायकल

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आतापर्यंत एकूण १० पदके मिळली आहेत. त्यापैकी वेटलिंफ्टिंगमध्ये आतापर्यंत भारताच्या नावावर एकूण सात पदकांची नोंद झाली आहे. तर, महिला ज्युदोपटू सुशीला देवी लिकमाबाम हिने रौप्य तर विजय कुमार यादवने कांस्य पदकाची कमाई केली आहे. भारतीय महिला लॉन बॉल संघाने सुवर्ण पदक पटकावले आहे.