भारतीय कुस्तीपटू रवी दहियाने पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. पुरूषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत त्याने नायजेरियाच्या एबिकेवेनिमो वेल्सनचा पराभव केला. २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो चौथा भारतीय कुस्तीपटू ठरला. त्यापाठोपाठ महिला कुस्तीपटू विनेश फोगटने ५३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले.

दुखापतीमुळे चार वर्षांपूर्वी रवी गोल्ड कोस्ट येथे खेळू शकला नव्हता. त्यामुळे, आजचे पदक हे त्याचे राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिलेच पदक ठरले आहे. रवी आणि विनेशने कुस्तीतील अनुक्रमे चौथे आणि पाचवे सुवर्णपदक जिंकले आहे. यापूर्वी, शुक्रवारी (५ ऑगस्ट) बजरंग पुनिया(६५ किलो), दीपक पुनिया (८६ किलो) आणि साक्षी मलिक (६२ किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले होते. तर, अंशु मलिकला (५७ किलो) रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

“होय, ऑलिम्पिकमध्ये ‘ती’ चूक झाली”, कुस्तीपटू विनेश फोगाटनं मान्य केला WFI चा आरोप!

उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडच्या सूरज सिंगवर सहज विजय मिळवून रवीने आपल्या राष्ट्रकुल मोहिमेला सुरुवात केली होती. उपांत्य फेरीत रवीला पाकिस्तानच्या अली असदचे कठीण आव्हान होते. परंतु, रवीने १४-४ गुणांच्या फरकासह विजय मिळवला. हरियाणातील सोनीपतमधील नहारी गावात जन्मलेला रवी दहिया सध्या दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारमध्ये शिक्षण संचालक आहे.

“७२ तासांत…”, विनेश फोगाटच्या आरोपानंतर कुस्ती महासंघाला क्रीडा मंत्रालयाचे निर्देश

विनेशची पदकांची हॅटट्रीक!

विनेश फोगटने महिलांच्या फ्रीस्टाइल ५३ किलो वजनी गटात श्रीलंकेच्या चामोदा केशनी मदुरावालेज डॉनचा पराभव केला. विनेशने २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पदकांची हॅटट्रीक केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग तीन पदकांची कमाई करणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे. याशिवाय, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.

Story img Loader