D. Gukesh becomes youngest-ever world champion: भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश विश्वविजेता ठरला आहे. दोम्माराजू गुकेश ने १८व्या वर्षी विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला. १८वर्षीय गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता डिंग लिरेनचं आव्हान मोडून काढत इतिहास घडवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आतापर्यंतच्या १३ डावांपैकी ३२वर्षीय लिरेनने पहिला डाव जिंकला होता. त्यानंतर गुकेशने तिसरा डाव जिंकून बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही ग्रँडमास्टर्सनी सलग सात डाव बरोबरीत सोडवले होते. ११व्या डावात गुकेशने विजय मिळवून बरोबरीची कोंडी सोडवली. १२व्या डावात लिरेनने बाजी मारली. अखेरचा डाव कोण जिंकणार की हा मुकाबला टायब्रेकरमध्ये जाणार याकडे बुद्धिबळ चाहत्यांचं लक्ष होतं. गुकेशने दमदार खेळ करत विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. सगळ्यात लहान वयाचा विश्वविजेता होण्याचा विक्रम आता गुकेशच्या नावावर नोंदला गेला आहे. लिरेनच्या हातून झालेल्या घोडचुकीनंतर गुकेश विश्वविजेता होणार असल्याचं स्पष्ट झालं आणि त्याच्या डोळ्यात विजयाश्रू तरळले.

हेही वाचा – VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम

गुरूवार, १२ डिसेंबर रोजी सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्याच्या १४व्या निर्णायक सामन्यात डिंग लिरेनचा पराभव करून सर्वात गुकेश विश्वविजेता ठरला. गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर विश्वविजेता ठरणार दुसरा भारतीय ठरला.

गुकेश आणि डिंग यांनी गुरुवारी सामन्याच्या अंतिम डावात प्रत्येकी ६.५ गुणांसह बरोबरी साधली. १४व्या डावात, ज्यात डिंग पांढऱ्या सोंगट्यासह खेळत होता, तो सामन्याच्या ५३व्या चालीत डिंगने चूक होईपर्यंत अनिर्णित दिशेने वाटचाल केली होती. गुकेशने खेळत राहत डिंगवर दबाव आणणं सुरू ठेवलं आणि यात गतवर्षीचा विश्वविजेता लिरेन फसला.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?

लिरेन आणि गुकेश यांच्यातील अंतिम डावातील सामना ही ड्रॉ हो”ण्याच्या मार्गावर होता पण डिंगच्या हातून मोठी घोडचूक घडली आणि त्याच्या हातातून सामना निसटला. डी गुकेश या ऐतिहासिक विजयानंतर म्हणाला, “सामन्यात जेव्हा मला कळलं की लिरेनने घोडचूक केली आहे, तो माझ्या जीवनातील खूप आनंदाचा क्षण होता. आपल्या सर्वांनाच माहितीय की लिरेन उत्कृष्ट खेळाडू आहे. तो बुद्धिबळच्या इतिहासातील एक उत्कृष्ट खेळाडू राहिला आहे. त्याने या सामन्यादरम्यान किती दबाव झेलला आणि शेवटपर्यंत हार न मानता दाखवून दिलं की खरा चॅम्पियन कसा असतो. माझ्यासाठी तो खरा विश्वविजेता आहे. मी जो क्षण अनुभवतो आहे तो अनुभवण्याचं प्रत्येक बुद्धिबळपटूचं स्वप्न असतं आणि आज मी माझं स्वप्न जगतो आहे. सर्वात आधी देवाचे खूप आभार.”

हेही वाचा – IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ

डी गुकेश त्याच्या सपोर्ट स्टाफचे आभार व्यक्त करताना पुढे म्हणाला, “गायो (ग्रेजेगोर्ज जेवस्की) गेल्या दोन वर्षांपासून माझे ट्रेनर होते. पॅडी उपटन माझ्या टीमचा भाग नसले तरी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी सराव करताना त्यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. Radosław Wojtaszek इथे आहेत. पेंटाला हरिकृष्णही आहेत. व्हिन्सेंट कीमर, जॅन-क्रिझिस्टोफ डुडा आणि जॅन क्लिमकोव्स्की हे माझ्या टीममधील इतर मंडळी आहेत. “

पॅडी उपटन हे मेंटल हेल्थ कोच आहेत. ते दक्षिण आफ्रिका संघाचे क्रिकेट प्रशिक्षक राहिले आहेत. याबरोबर ते आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचे २०१५-२०१५ आणि २०१९-२०२० दरम्यान कोच होते. तर दिल्ली कॅपिटन्स संघाचे २०१६ मध्ये प्रशिक्षक होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: D gukesh becomes youngest ever world champion in history after beating ding liren bdg