D Gukesh Prize Money After Winning World Test Championship: भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेशने ऐतिहासिक कामगिरी करत जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. गुरुवारी १४व्या आणि अंतिम सामन्यात गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून वयाच्या १८व्या वर्षी सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला. या वर्षाच्या सुरुवातीला कँडिडेट्स टूर्नामेंट जिंकल्यानंतर गुकेश हा जागतिक विजेतेपदासाठी आव्हान देणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. गुकेशला वर्ल्ड चॅम्पियन ठरल्यानंतर किती बक्षिसाची रक्कम मिळाली, जाणून घ्या.

जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप ही क्रीडा जगतात सर्वाधिक बक्षीस रक्कम असलेल्या चॅम्पियनशिपपैकी एक आहे. या चॅम्पियनशिपची बक्षीस रक्कम २.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे २१ कोटी रुपये आहे.

World Championship Chess Tournament Dommaraju Gukesh defeats Ding Liren sport news
जगज्जेतेपदाच्या दिशेने गुकेशचे पाऊल; ११व्या डावात डिंगवर मात
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
aamir khan got award red sea films
आमिर खानने अनेक वर्षानंतर लावली अवॉर्ड शोला हजेरी, मिळाला ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार
world chess championship 9th game between d gukesh and ding liren ends in draw
डाव नवा, निकाल तोच! गुकेशच्या प्रयत्नांना अपयशच; सलग सहावी बरोबरी
icc agree for hybrid format for 2025 champions trophy
चॅम्पियन्स करंडक स्पर्धा संमिश्र प्रारूप आराखड्यानुसारच? २०२७ सालापर्यंतच्या सर्व स्पर्धांसाठी हाच नियम
highest gst revenue comes from 18 percent tax slab
सर्वाधिक जीएसटी महसूल १८ टक्के करटप्प्यातून
arjun erigaisi becomes second indian to cross 2800 elo rating
एरिगेसीकडून २८०० एलो गुणांचा टप्पा पार
World Championship Chess Tournament Ding and Dommaraju Gukesh draw sports news
पाचव्या डावातही बरोबरी; गुकेशच्या चुकीचा फायदा करून घेण्यात डिंग अपयशी

हेही वाचा – D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास

बुद्धिबळची आंतरराष्ट्रीय संघटना FIDE च्या नियमांनुसार, अंतिम सामना खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामना जिंकण्यासाठी २० हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे १.६९ कोटी रुपये मिळतात. तर उर्वरित रक्कम दोन्ही खेळाडूंमध्ये समान प्रमाणात विभागली जाते.

डी गुकेशने चॅम्पियनशिपमध्ये तीन सामने जिंकले होते. त्याने तिसरा, ११वा आणि शेवटचा सामना जिंकला. यासाठी त्याला ६० हजार डॉलर म्हणजेच ५.०७ कोटी रुपये मिळाले. तर लिरेनने दोन सामने जिंकले आहेत ज्यासाठी त्याला ३.३८ कोटी रुपये मिळाले आहेत. उरलेली रक्कम दोघांमध्ये समान प्रमाणात विभागली गेली. म्हणजेच गुकेशला एकूण १.३५ मिलियन डॉलर्स म्हणजेच ११.४५ कोटी रुपये तर लिरेनला १.१५ मिलियन डॉलर्स म्हणजेच ९.७५ कोटी रुपये मिळाले आहेत.

हेही वाचा – Who is D Gukesh: कोण आहे डी गुकेश? वडिलांनी करिअर लावलं पणाला अन् लेक १८व्या वर्षी ठरला विश्वविजेता; वाचा त्याची कहाणी

डी गुकेश हा विश्वनाथन आनंद यांच्यानंतर बुद्धिबळ विश्वविजेता ठरलेला दुसरा भारतीय खेळाडू आहे. १४व्या डावात गुकेशचे गण ७.५ तर लिरेनचे ६.५ होते. अखेरच्या क्षणी डिंग लिरेनने मोठी घोडचूक केली, गुकेशला त्याची चूक कळताच त्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं आणि तो खुर्चीवरून उठून मागे गेला. लिरेनला त्याची चूक उमगल्यावर तोही बिथरला आणि थोड्यावेळाने त्याने हात मिळवत माघार घेतली आणि डी गुकेश सर्वात तरूण विश्वविजेता बुद्धिबळपटू ठरला.

Story img Loader