Dale Steyn on Sachin Tendulkar: मागच्या पिढीतील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक, डेल स्टेन हे फलंदाजाच्या मनात भीती निर्माण करणारे नाव असून या ‘स्टेन गनने’ उच्च वेगाने चेंडू स्विंग करण्याच्या क्षमतेने गेल्या काही वर्षांपासून दिग्गजांना त्रास दिला आहे. पण स्टेनने अधिक विकेट्स मिळवण्यासाठी आणि ज्या फलंदाजांना तो अडचणीत आणू शकला नाही त्यांच्यासाठी वेळ वाया घालवू नये यासाठी त्याच्या स्वतःच्या काही युक्त्या होत्या.
सचिनसमोर कायम असहाय्य
एका मुलाखतीत सचिन विषयी बोलताना डेल स्टेन म्हणतो, “सचिन तेंडुलकर हा अप्रतिम फलंदाज होता. तो कसोटी क्रिकेट तर उत्तम खेळायचा. त्याने खेळलेले शॉट्स हे सर्वोत्तम होते. तो ते कोणाचेही पाहून मारायचा नाही. या गोष्टीला तुम्ही कौतुकाने होकार द्याल. त्यांना तुमच्या कौशल्याचीही जाणीव आहे म्हणून ते फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. फलंदाजाकडे फक्त एकदाच संधी असते, जिथे गोलंदाजाला किमान सहा चेंडू मिळतात.”
सचिनला गोलंदाजी करताना वाटणाऱ्या भावनाविषयी डेल स्टेन म्हणतो, “मी आउट स्विंग टाकला तर तो चेंडू सोडून द्यायचा, मी इनस्विंग केला तर तो चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळायचा आणि बाउन्सर टाकला तर तो खाली वाकायचा. माझ्या प्रत्येक चेंडूला त्याच्याकडे उत्तर होते. त्यामुळे त्याला गोलंदाजी करताना मला नेहमी असहाय्य वाटायचे. असे अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू होते ज्यांना गोलंदाजी करणे अवघड होते. पण सचिनला आउट तरी कसे करायचे असा प्रश्न पडायचा. त्यामुळे जेव्हा त्याची विकेट मिळायची तेव्हा खूप मोठे यश मिळाल्यासारखे वाटायचे.”
सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने आपल्या कारकिर्दीतील अनेक मनोरंजक किस्से उघड केले. सचिन तेंडुलकरबद्दल बोलताना, ३८ वर्षीय वेगवान गोलंदाजाने कबूल केले की त्याने जाणूनबुजून महान भारतीय फलंदाजाला एक धाव दिली जेणेकरून इतर (जे सचिन तेंडुलकरपेक्षा कमकुवत होते) फलंदाज गोलंदाजी करू शकतील. स्टेनने एका वेबसाइटला सांगितले, “हो, नक्कीच. एक वेगवान गोलंदाज म्हणून मला दिवसभर धावा आणि वेगवान गोलंदाजी करायची होती. पण कधी-कधी तुम्हाला माहित असेल की दुसऱ्या टोकाला खेळणाऱ्या फलंदाजाला काही फरक पडत नाही. त्याची चिंता नाही. मग अशा परिस्थितीत आपली ऊर्जा वाया घालवून काय उपयोग. म्हणून आपण कमकुवत दुव्याकडे लक्ष द्या.”
एकदिवसीय क्रिकेटमध्ये, सचिन तेंडुलकरने भारतासाठी एकूण १३४२ षटके टाकली, तर शोएब अख्तरने पाकिस्तानसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण १२९४ षटके टाकली. त्याच वेळी डेल स्टेनने दक्षिण आफ्रिकेसाठी १०४२ षटके टाकली. सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील गोलंदाजी विक्रमाबद्दल बोलायचे तर त्याने ४६३ सामन्यांच्या २७० डावांमध्ये ८०५४ चेंडू टाकले आणि त्यात ६८५० धावा दिल्या. सचिनने एकदिवसीय सामन्यात १५४ विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या ३२ धावांमध्ये ५ विकेट होती. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत दोनदा एका सामन्यात पाच विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी केली, तर चार सामन्यांत चार विकेट्स घेतल्या.